एक्स्प्लोर
प्रणिती, नवरा कुठल्याही जातीचा कर, पण...: शिंदे
मुंबई : अमृतमहोत्सवी वर्षानिमित्ताने राज्याचे माजी मुख्यमंत्री आणि माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांनी 'माझा कट्टा'वर दिलखुलास गप्पा मारल्या. माझा कट्ट्यावरच्या बाऊन्सर्समध्ये एक होता तो अर्थातच सुशीलकुमार शिंदेंच्या आमदार कन्या प्रणिती यांच्या लग्नाबद्दलचा. प्रणितीवर लग्नाचा दबाव नसून तिला कोणत्याही जातीत लग्न करण्याची मुभा असल्याचं शिंदेंनी सांगितलं.
प्रणितीच्या लग्नाविषयी बोलताना सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, "लग्न व्हायचं तेव्हा होतं, दबाव टाकून होत नाही. मी खुल्या विचारांचा माणूस आहे. जोडीदार निवडण्याचा अधिकार तिला असायला हवा या मताचा मी आहे. तू कुठल्याही जातीचा नवरा कर, पण तो कमावता असला पाहिजे. जो तुला कायम साथ देईल, असा जोडीदार निवड."
आंतरजातीय लग्न यशस्वी व्हावीत, शिंदेंची अपेक्षा
माझा आंतरजातीय विवाह आहे. आम्ही पळून जाऊन लग्न केलं. माझी पत्नी कायस्थ आहे. एखादी मुलगी तुमच्यावर प्रेमापोटी आयुष्यात रिस्क घेते. ते तुम्ही सांभाळायला हवं. आंतरजातीय लग्न यशस्वी व्हावीत या मताचा मी आहे. त्यामुळे जातविरहिक समाज व्हायला मदत होईल.
'नागराज मंजुळेचं काम कौतुकास्पद'
शिंदेंनी यावेळी दिग्दर्शक नागराज मंजुळेचं कौतुक केलं. 'सैराट' सिनेमा पाहिला. अतिशय सुरेख चित्रपट आहे. करमाळा हा माझा पहिला मतदारसंघ. नागराज मंजुळेचं काम कौतुकास्पद आहे. तो ज्या समाजातून येतो, ते पाहता त्याचं काम फारच मोठं आहे, असं शिंदे म्हणाले.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
राजकारण
व्यापार-उद्योग
विश्व
Advertisement