महादेव मुंडेला भोसकून खल्लास केलं, सुरेश धस यांचा नवा गौप्यस्फोट, पहिल्यांदाच घेतलं आकाच्या मुलाचं नाव!
सुरेश धस यांनी महादेव मुंडे खून प्रकरण समोर आणले आहे. या प्रकरणात सुरेश धस नवनवे गौप्यसफोट केले आहेत. पुढच्या तीन दिवसांत या खून प्रकरणातील आरोपींना अटक झाली पाहिजे, अशी मागणीही त्यांनी केली आहे.
बीड : एकीकडे मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख हे प्रकरण ताजे असताना आता आमदार सुरेश धस यांनी महादेव मुंडे हत्या प्रकरण समोर आणले आहे. महादेव मुंडे (Mahadev Munde Murders Case) हा इसम मुळचे कन्हेरवाडीचा होता. त्याची 22 ऑक्टोबर 2023 रोजी हत्या करण्यात आली होती. त्यांची परळी वैजनाथच्या तहसीलसमोर हत्या करण्यात आली होती. याच प्रकरणात सुरेश धस यांनी नव्याने अनेक गौप्यस्फोट केले असून पहिल्यांदाच आकाच्या मुलाचं नाव घेतलं आहे. तसंच पुढच्या तीन ते चार दिवसात आरोपींना अटक झालीच पाहिजे, अशी मागणी त्यांनी केली आहे.
वाल्मिक कराड यांच्या मुलाचं थेट नाव घेतलं
महादेव मुंडे हे दुधाचा व्यवसाय करायचे. पाच ते सहा जणांनी या व्यक्तीला जीवे मारलं. परळी पोलीस ठाण्याचे सानप नावाचे पोलीस अधिकारी होते. महादेव मुंडे खून प्रकरणातील आरोपींची नावे सानप यांनी शोधली होती. मात्र आकांनी त्यांना पकडायचे नाही, असे सांगितले. त्याऐवजी राजाभाऊ फड आणि अजून दोन चार जणांना अटक करण्याचे सांगितले. पण सानप यांनी त्यास नकार दिला. पुढे सानप यांच्यावर दबाव टाकण्यात आला. पुढे स्वत:हून त्यांनी बदली करून घेतली. मुंडे यांच्या खुनाची घटना 23 ऑक्टोबर 2023 रोजी झाली. या घटनेतील सर्व आरोपी आकाचे चिरंजीव सुनिल कराड यांच्या अवतीभोवती फरत असतात. रोजच हे त्यांच्यासोबत असतात. अजूनही या आरोपींना अटक करण्यात आलेलं नाही, असा आरोप सुरेश धस यांनी केला.
महादेव मुंडेचा चाकू भोसकून खून केला
महादेव मुंडे यांची हत्याप्रकरणात पुढच्या दोन ते तीन दिवसांत आरोपी सापडतात की नाही ते बघा. या महादेव मुंडे यांना जीवे मारून टाकण्यात आलं. यातील आरोपी अटक व्हायला नकोत का? या माणसाच्या जीवाची काही किंमत आहे की नाही. त्याला भोकसून खल्लास करण्यात आलं. त्यांचा रतिबाचा धंदा होता. एवढ्या गरीब माणसाला मारून टाकण्यात आलं.
आरोपी सुनिलच्या आजूबाजूला फिरत आहेत
या माणसाला मारून टाकून अमूक-अमूक व्यक्तीला आरोपी करून का, राजाभाऊ फड यांचे नाव घ्या असे सांगितले जात होते. राजाभाऊ फड हे विधानसभा निवडणुकीसाठी उभे राहणार होते. या प्रकरणातील आरोपींना पकडू नका असे आकाने सांगितले होते. हेच आरोपी आकाच्या मुलाच्या आजूबाजूला फिरत आहेत. आकाचा मुलगा सुनिल आहे. गेल्या तीन ते चार महिन्यांपासून हे आरोपी सुनिलच्या आजूबाजूला फिरत आहेत. महादेव मुंडे यांनी यांचं नेमकं काय काप केलं होतं? याची मला कल्पना नाही. मात्र त्या लोकांनी महादेव मुंडेला मारलं हे मात्र निश्चित, असा गौप्यस्फोट सुरेश धस यांनी केला.
सगळ्या एजन्सी आकानेच घेतल्या आहेत
या भागात आकांची दहशत आहे. अजूनही लोक पुढे येत नाहीयेत. लोक बोलतील. अजून बरीच प्रकरणं येणार आहेत. गायछापच्या एजन्सीसह इतरही एजन्सी आकाने घेतलेल्या आहेत. मारवाडी, लिंगायत समाजाची तसेच इतर समाजीच अनेक लोकं आहेत, त्यांच्या एजन्सी या आकाने स्वत:कडे घेतलेल्या आहेत. आता हे लोक तक्रार करायला पुढे येतील, असंही सुरेश धस म्हणाले.
Video News :
हेही वाचा :
22 ऑक्टोबरला महादेव मुंडेंचा परळीत खून; सुरेश धसांनी पुन्हा घेतलं आकाचं नाव, सीसीटीव्हीवरही भाष्य