एक्स्प्लोर
लातूरमधील कॉपी प्रकरण, केंद्र संचालकांची तात्काळ बदली
लातूर : लातूरमधील कॉपी प्रकरणानंतर केंद्र संचालक झरकर आर. के. यांची तात्काळ बदली करण्यात आली आहे. विभागीय सचिव गणपत मोरे यांनी ही माहिती दिली. एबीपी माझाने यासंबंधित वृत्त दाखवल्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
बारावी इंग्रजी पेपरमध्ये सर्रासपणे कॉपी केलं जात असल्याचं लातूर जिल्ह्यातल्या निलंगा तालुक्यात समोर आलं होतं. इंग्रजीचा पेपर सुरु होताच काही मिनिटातच प्रश्नपत्रिका बाहेर आणण्यात आली. परीक्षार्थीच्या नातलगांनी कार्बनच्या साहाय्याने कॉपी लिहून आत पाठवली.
निलंगा तालुक्यातील शिवनी कोतल येथील शामगीर माध्यमिक विद्यालयात हा सर्व प्रकार घडला. त्यामुळे भरारी पथक आणि बैठं पथक काय करत होतं, असा सवाल उपस्थित करण्यात आला.
बारावीच्या परीक्षेला राज्यभरात सुरुवात झाली आहे. पण पहिल्याच पेपरला कॉपीचा प्रकार समोर आला आहे.
लातूर जिल्ह्यातील 35 हजार 536 विद्यार्थी परीक्षेला बसले आहेत. जिल्ह्यात 78 परीक्षा केंद्र असून प्रत्येक केंद्रावर बैठे पथक तसेच आठ भरारी पथकांची करडी नजर परिक्षेवर असेल, असं सांगण्यात आलं होतं. मात्र कॉफी मुक्त परीक्षा घेण्याच्या मानसाला पहिल्याच दिवशी गालबोट लागलं.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
नांदेड
मुंबई
निवडणूक
पुणे
Advertisement