एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांचं पंढरपुरात ठिय्या आंदोलन
पंढरपूर : आषाढी एकादशीच्या पूर्वसंध्येला माऊलींच्या पालखीतील वारकऱ्यांनी सरगम टॉकीज समोर ठिय्या आंदोलन केलं. नवीन मंदिर समिती बरखास्त करा, अशी या वारकऱ्यांची मागणी आहे.
आषाढी एकादशीच्य अदल्या दिवशी पंढरपूरच्या विठ्ठल-रुक्मिणी मंदिरची देवस्थान समितीसाठी एकूण नऊ जणांची नवीन समितीची घोषणा करण्यात आली. यामध्ये कऱ्हाडचे अतुल भोसले यांची मंदिर समितीच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
तर आ . रामचंद्र कदम, शकुंतला विजयकुमार नडगिरे, दिनेशकुमार कदम, सचिन अधटराव, भास्करगिरी गुरु किसनगिरी बाबा, गहिनीनाथ ज्ञानेश्वर महाराज औसेकर, संभाजी हिरालाल शिंदे यांची सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली. तर पंढरपूर नगरपालिकेच्या नगराध्यक्षा साधना भोसले यांची पदसिद्ध सदस्य म्हणून नियुक्ती जाहीर करण्यात आली.
मंदिर समितीमध्ये राजकारण्यांचा भरणा करण्यात आल्याचा आरोप माऊली पालखीतील वारकऱ्यांनी केला आहे. त्यामुळे संतप्त वारकऱ्यांनी पंढरपूरमधील सरगम टॉकीजसमोर ठिय्या आंदोलन सुरु केलं. दरम्यान, हे आंदोलन सुरू असताना पंढरपुरातली वीजही गेली होती.
वारकऱ्यांच्या या ठिय्या आंदोलननंतर प्रशासनाचे अधिकाऱ्यांनी वारकऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. यानंतर वारकऱ्यांनी आपलं आंदोलन मागे घेतलं. या प्रकरणी पालकमंत्री विजय देशमुख हे देखील वारकऱ्यांशी चर्चा करणार आहेत.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
सोलापूर
निवडणूक
Advertisement