एक्स्प्लोर
SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहावीत गणिताचं 10 मार्कांचं प्रॅक्टिकल
विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पनांचं आकलन चांगल्याप्रकारे व्हावं, यासाठी SSC बोर्डाच्या विद्यार्थ्यांना दहावीत गणिताचं 10 मार्कांचं प्रॅक्टिकल असेल

प्रातिनिधिक फोटो
मुंबई : पुढील शैक्षणिक वर्षापासून इयत्ता दहावीत गणित विषयाला 10 गुणांची प्रात्यक्षिक परीक्षा असणार आहे. तर नववीच्या विद्यार्थ्यांना यंदाच्या वर्षापासूनच गणिताची प्रॅक्टिकल परीक्षा द्यावी लागणार आहे. विद्यार्थ्यांना गणितातील संकल्पनांचं आकलन चांगल्याप्रकारे व्हावं, यासाठी हा निर्णय घेण्यात आला.
राज्य माध्यमिक शिक्षण मंडळाकडून सोमवारी हा निर्णय जाहीर करण्यात आला. इयत्ता नववीसाठी चालू शैक्षणिक वर्ष (मार्च 2018 मध्ये होणाऱ्या परीक्षेसाठी) या निर्णयाची अंमलबजावणी केली जाणार आहे. तर पुढील शैक्षणिक वर्षापासून दहावीच्या प्रत्येक सेमिस्टरसाठी गणित या विषयाला 10 गुणांची प्रॅक्टिकल परीक्षा असेल.
2017-18 या शैक्षणिक वर्षासाठी इयत्ता नववीची पाठ्यपुस्तकं बदलण्यात आली आहेत. त्यामुळे नववीसाठी यंदाच नवी मूल्यांकन पद्धत लागू करण्यात येईल, तर 2018-19 या वर्षापासून ती दहावीसाठी वापरली जाईल. प्रत्येक सत्रात विद्यार्थ्यांना अंतर्गत प्रात्यक्षिक परीक्षेला सामोरं जावं लागेल.
फायनल परीक्षेत बीजगणिताला 40 तर भूमितीला 40 गुण आहेत. उर्वरित 20 गुणांविषयी अद्याप अस्पष्टता असल्याचं गणिताच्या काही शिक्षकांनी म्हटलं आहे.
आणखी वाचा
महत्त्वाच्या बातम्या
भारत
महाराष्ट्र
ठाणे
क्रिकेट























