एक्स्प्लोर

नाशिकमध्ये स्कॉटलंडहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह

नागपूर- 4, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी - 3, पुणे - 2 आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी 1 अशी संख्या आहे.

नाशिक : स्कॉटलंडहून आलेला प्रवासी कोरोना पॉझिटिव्ह आढळला आहे. 13 डिसेंबरला नाशिकमध्ये आलेल्या प्रवाशाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. रुग्णावर खाजगी रुग्णालयात उपचार सुरू आहे. रुग्णाचे स्वब पुढील तपासणीसाठी पुण्याच्या  NIV लॅबला पाठवले आहेत. संबंधित  रुग्णाची नाशिकमध्ये राहणारी आई देखील पॉझिटिव्ह आढळली आहे. मात्र आता आईमुळे मुलाला कोरोनाची लागण झाली की मुलामुळे आईला लागण झाली हे टेस्ट रिपोर्ट नंतर कळेल.

इंग्लंडमध्ये बदल झालेला करोना विषाणू आढळल्याच्या पार्श्वभूमीवर दिनांक 25 नोव्हेंबर 2020 नंतर राज्यात इंग्लंडहून आलेल्या प्रवाशांचे सर्वेक्षण करण्यात येत आहे, या संदर्भातील तपशीलानुसार आजपर्यंत 1122 प्रवाशांची आरटीपीसीआर चाचणी करण्यात आली. यापैकी 16 प्रवाशी कोरोना बाधित आढळून आले आहेत. यामध्ये नागपूर- 4, मुंबई आणि ठाणे प्रत्येकी - 3, पुणे - 2 आणि नांदेड, अहमदनगर, औरंगाबाद व रायगड प्रत्येकी 1 अशी संख्या आहे. बाधित रुग्णांच्या निकट सहवासितांचा शोध घेण्यात येत आहे. आजवर शोधण्यात आलेल्या 72 निकट सहवासितांपैकी 2 निकट सहवासित करोना बाधित आढळले आहेत.

राष्ट्रीय कृती दलाने कोविड-19 साठी चाचणी, उपचार आणि निरीक्षण करण्याच्या धोरणांवर चर्चा

आयसीएमआरने आज नीती आयोगाचे सदस्य प्रा. विनोद पॉल, आरोग्य संशोधन विभागाचे सचिव आणि आयसीएमआरचे महासंचालक प्राध्यापक बलराम भार्गव यांच्या सह-अध्यक्षतेखाली कोविड-19 वरील राष्ट्रीय कृती दलाची (एनटीएफ) बैठक आयोजित केली होती. ब्रिटनमधून विषाणूचा नवीन प्रकार समोर आल्याच्या अलिकडच्या वृत्ताच्या पार्श्वभूमीवर सार्स-कोव्ह-2 साठी चाचणी, उपचार आणि देखरेख करण्याच्या धोरणामध्ये तथ्यांवर आधारित सुधारणांवर चर्चा करणे हा एनटीएफचा मुख्य हेतू होता. अस्थिर स्ट्रेनमध्ये 14 समान नसलेले (अमिनो ऍसिड बदल) फेरफार, 6 समान (गैर अमिनो ऍसिड बदल) आणि 3 विलोपन आहेत. एसीई 2 इंद्रियांच्या बंधनकारक जागांमध्ये (रिसेप्टर बाईंडिंग डोमेन) वाहून नेणार्‍या अनुकुचीदार (स्पाइक) (एस) जनुकात आठ उत्परिवर्तन आहेत ज्यामुळे मानवी श्वसन पेशींमध्ये विषाणूचा प्रवेश होतो.

एनटीएफने सध्याच्या राष्ट्रीय उपचार मसुद्याशी संबंधित बाबींबद्दल, सार्स-कोव्ह-2 तसेच ब्रिटनमधील अस्थिर स्ट्रेनच्या तपासणीची रणनीती आणि देखरेख यावर तपशीलवार चर्चा केली. ब्रिटनच्या अस्थिर अशा वैविध्यपूर्ण स्ट्रेनमुळे विषाणूची संक्रमितता वाढू शकते, त्यामुळे या विषाणूची लागण झालेल्या व्यक्तींची ओळख पटविणे आणि भारतात त्याचा प्रसार रोखण्यासाठी पुरेशी काळजी घेणे आवश्यक आहे, यावर यावेळी जोर देण्यात आला.

राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्राने या विषाणू स्ट्रेनचा युनायटेड किंग्डममधील उद्भव आणि अनार्य देशांचा या संदर्भातील प्रतिसाद यांची नोंद घेतली आहे. परिस्थितीचा सक्रीयतेने आढावा घेतला जात आहे. नवीन स्ट्रेनचा सुगावा लावून त्याच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी धेय्यधोरण आणि रणनीती आखण्यात आली आहे.

रणनीतीची ठळक वैशिष्ट्ये

प्रवेशाच्या ठिकाणी (भारतातील सर्व आंतरराष्ट्रीय विमानतळ)

- 21 डिसेंबर ते 23 डिसेंबर 2020 दरम्यान ब्रिटनहून आलेल्या सर्व प्रवाशांची विमानतळांवर चाचणी घेण्यात आली आहे. - आरटी-पीसीआर चाचणी निकाल मिळाल्यानंतरच संक्रमण झालेले नाही अशा प्रवाशांना विमानतळावरून बाहेर पडायला परवानगी देण्यात आली - सर्व बाधित प्रवाशांना संस्थागत अलगीकरणात ठेवले जाते आणि त्यांचे नमुने संपूर्ण जीनोम सिक्वेंसींग (डब्ल्यूजीएस) साठी पाठविले जातात. - डब्ल्यूजीएस निकालानंतर उत्परिवर्तन नसलेल्याची पुष्टी झाल्यानंतरच, विद्यमान व्यवस्थापन धोरणानुसार बाधित रुग्णांना संस्थागत अलीगीकरण केंद्रातून बाहेर जाण्याची परवानगी दिली जाते. - बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या सर्व व्यक्तींना देखील सुविधा विलगीकरण केंद्रात ठेवले जाते आणि आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचनांनुसार त्यांची चाचणी केली जाते

समुदाय देखरेख

- इमिग्रेशनने ब्युरोने गेल्या २८ दिवसात ब्रिटनमधून आलेल्या सर्व प्रवाशांची यादी संबंधित राज्यांसोबत सामायिक केली आहे - 25 नोव्हेंबर ते 20 डिसेंबर 2020 दरम्यान ब्रिटनहून आलेल्या सर्व प्रवाशांचे आयडीएसपी राज्य देखरेख कक्ष (एसएसयू) आणि जिल्हा देखरेख कक्ष (डीएसयू) माग ठेवत आहेत. - या प्रवाशांची आयसीएमआर मार्गदर्शक सूचनांनुसार चाचणी घेण्यात येत आहे आणि सर्व बाधित रुग्णांना अनिवार्य सुविधा अंतर्गत अलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. - सर्व बाधित रुग्णांचे नमुने डब्ल्यूजीएसकडे पाठविले जात आहेत. - या बाधित रुग्णांच्या संपर्कात आलेल्या व्यक्तींना शोधण्याचे काम हाती घेण्यात आले आहे आणि या लोकांना देखील सुविधा विलगीकरण कक्षात ठेवण्यात येत आहे. - 14 दिवसानंतर दोन नमुन्यांची चाचणी नकारात्मक असल्याची खात्री करून घेतल्यानंतरच या बाधित रुग्णांना घरी सोडण्यात येते.

अपेक्षित देखरेख

- सर्व राज्ये / केंद्रशासित प्रदेशांमधील 5 टक्के बाधित रुग्णांची डब्ल्यूजीएससाठी चाचणी केली जाईल - एनसीडीसी, नवी दिल्ली यांच्या नेतृत्वाखाली देशातील सार्स-कोव्ह-2 च्या प्रसारित स्ट्रेनचा प्रयोगशाळेत आणि साथीच्या रोगनिदानविषयक पाळत ठेवण्यासाठी 'जीनॉमिक देखरेख संघ INSACOG ची स्थापना केली आहे. याव्यतिरिक्त, सध्या ब्रिटनहून आलेल्या 50 हून अधिक नमुने नियुक्त केलेल्या प्रयोगशाळांमध्ये अनुक्रमित केले जातील. कन्सोर्टियममधील इतर प्रयोगशाळांमध्ये राष्ट्रीय रोग नियंत्रण केंद्र, दिल्ली; सीएसआयआर-जीनॉमिक्स एण्ड इंटिग्रेटिव्ह बायोलॉजी संस्था, दिल्ली;सीएसआयआर- सेल्युलर अणि आण्विक जीवशास्त्र केंद्र, हैदराबाद; डीबीटी- आयुर्विज्ञान संस्था, भुवनेश्वर; डीबीटी-नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ बायोमेडिकल जीनोमिक्स, कल्याणी; डीबीटी-इनस्टेम-राष्ट्रीय जैविक विज्ञान केंद्र, बंगळूरू; नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ मेंटल हेल्थ एण्ड न्यूरोसायन्स (निम), बंगळूरू;आयसीएमआर- नॅशनल इंस्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजी, पुणे यांचा समावेश आहे.

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली

व्हिडीओ

Special Report on Sambhajinagar Sena : रशीद मामू खैरे, दानवेंमधला सामना पक्षाला महागात पडणार?
Sanjay Kelkar on Thane Mahayuti : ठाण्यातील महायुतीवर नाराजी असली तरी युती धर्म पाळणार
Chandrakant Khaire vs Ambadas Danve : भाजपला सोपं जावं म्हणून दानवेंनी... खैरेंचे स्फोटक आरोप
Anandraj Ambedkar BMC Election : भविष्यात आम्हीही बंधू एकत्र येऊ;आनंदराज आंबेडकरांचं मोठं वक्तव्य
Chhatrapati Sambhajinagar BJP : संभाजीनगरात भाजपमध्ये नाराजीचा उद्रेक, अतुल सावेंसमोर नाराज संतप्त

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
अर्ज भाजपचा, एबी फॉर्म शिंदेंच्या शिवसेनेचा, ऐनवेळी शिंदेच्या शिवसेनेत दाखल झालेल्या लता दलाल यांचा उमेदवारी अर्ज बाद  
Buldhana : लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
लाचखोर अधिकारी अखेर जाळ्यात, ACF अश्विनी आपेट 15 हजारांची लाच घेताना सापडली
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
नाशिक अक्कलकोट 374 किमीचा 6 पदरी महामार्ग, केंद्राची मंजुरी; नववर्षाच्या पूर्वसंध्येलाच मोदींकडून महाराष्ट्राला गिफ्ट
BMC Election : मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मोठी बातमी! मुंबईत ठाकरे गटाच्या पाच उमेदवारांचे अर्ज बाद होण्याची शक्यता, शिंदे गटाचा आक्षेप अन् धाकधूक वाढली
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
मतदानापूर्वीच भाजपचा विजयी षटकार, बिनविरोध झाले 6 उमेदवार; कल्याण-डोंबवलीतील मोठी आघाडी
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
पिंपरी चिंचवड महापालिकेसाठी राष्ट्रवादीच्या 128 उमेदवारांची यादी, शरद पवारांचे किती?
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 31 डिसेंबर 2025 | बुधवार
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
मावळत्या वर्षाला 2025 निरोप; पर्यंटकांची समुद्रकिनारी गर्दी, सूर्यास्ताचा क्षण कॅमेऱ्यात कैद, पाहा फोटो
Embed widget