एक्स्प्लोर
सोलापूरमध्ये तिघा बाईकस्वार विद्यार्थ्यांचा अपघातात मृत्यू
रात्री चहा पिण्याची तलफ आल्यामुळे ते तिघं बाहेर पडले, त्यावेळी त्यांचा अपघात झाला

सोलापूर : सोलापूरमध्ये एका अपघातात मोटारसायकलवर जाणाऱ्या तीन विद्यार्थ्यांचा जागीच मृत्यू झाला. तिघंही आर्किड अभियांत्रिकीचे विद्यार्थी होते. तिघं जण ग्रंथालयात रात्री उशिरापर्यंत अभ्यास करत होते. मात्र रात्री चहा पिण्याची तलफ आल्यामुळे ते तिघं बाहेर पडले. चहा प्यायला गेलं असताना अज्ञात वाहनानं त्यांना धडक दिली. यामध्ये तिघांचा जागीच मृत्यू झाला. उत्तर सोलापूर तालुक्यातील तळे हिप्परगा जवळ हा अपघात झाला. 21 वर्षीय संगमेश माळगे, 21 वर्षीय दीपक गुमडेल आणि आणि 22 वर्षीय अक्षय आसबे यांना प्राण गमवावे लागले.
आणखी वाचा























