Smart Bulletin | स्मार्ट बुलेटिन | 2nd may 2021 | रविवार | ABP Majha
दिवसभरात महत्त्वाच्या बातम्यांचा वेगवान आढावा या बुलेटीनच्या माध्यमातून घेतला जातो. यामध्ये देशभरासह राज्यातील कोरोना संबंधित, राजकीय, सामाजिक, आर्थिक, क्रीडा तसेच इतर महत्वाच्या बातम्यांचा आढावा घेतला जातो.
1. पश्चिम बंगाल, केरळ, तामिळनाडू, आसारमसह केंद्रशासित पुदुच्चेरी विधानसभा निवडणुकीचा आज निकाल, कोण गड राखणार याकडे देशाचं लक्ष, एबीपी माझावर निकालांचं महाकव्हरेज
2. देशामध्ये 4 लोकसभा आणि 13 विधानसभेच्या पोटनिवडणुकांचाही आज निकाल, पंढरपुरात राष्ट्रवादी विरुद्ध भाजपचा सामना
3. देशात तब्बल 4 लाखांहून अधिक कोरोनाबाधितांची नोंद, कोरोना नियंत्रणात आणण्यासाठी प्रशासनापुढे अनेक अडचणी, नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा
4. मार्च महिन्यातच कोरोनाच्या दुसऱ्या लाटेचा इशारा, शास्त्रज्ञांच्या माहितीवर केंद्र सरकारचं दुर्लक्ष, उपस्थित केला जातोय महत्त्वाचा प्रश्न, कारण ठरतंय देशातील कोरोनाबाधितांचा आकडा
5. देशातील जनतेला मरायला सोडलं आहे का, कोरोना परिस्थितीवरुन नाना पटोले यांचा केंद्र सरकारला खडा सवाल
6. लॉकडाऊननंतरही राज्यात रुग्णसंख्या कमी होईना; शनिवारी तब्बल 63 हजार नव्या रुग्णांची भर, दिवसभरात 61 हजार 326 रुग्णांची कोरोनावर मात
7. राज्यभरातील चिकन, मटण, कोंबडी व इतर खाद्यपदार्थांची दुकान वीकेंडलाही सकाळी 11 वाजेपर्यंत सुरु, आंबा विक्रेत्या दुकानदारांनाही 11 वाजेपर्यंत दुकानं सुरु ठेवण्याची मुभा
8. कल्याणमध्ये नाव नोंदणी न केलेल्यांचीही लसीकरणासाठी केंद्रावर गर्दी,नियोजनशून्य कारभाराचा स्थानिकांचा आरोप
9. सीबीएसई दहावी बोर्डाच्या अंतर्गत मूल्यांकनाबाबतचे निकष जारी, 20 जूनपर्यंत निकालाची शक्यता
10. हिंगोलीत सशस्त्र सीमा दलातील 110 जवानांना कोरोनाची लागण, 315 जवानांच्या आरटीपीसीआर चाचणीनंतर समोर आला निकाल