एक्स्प्लोर

Vaishali Made | गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी प्रवेश कार्यक्रम 15 दिवस पुढे ढकलला, शरद पवारांच्या आजारपणामुळे निर्णय

वैशाली माडे (Vaishali Made) यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या (NCP) मुंबईतील प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ नेते उपस्थित राहणार होते. 15 दिवसानंतर माडे यांच्या पक्षप्रवेशाची नवी तारीख जाहीर करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी जाहीर केलं आहे.

अकोला :  सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमधील प्रवेश सोहळा आता पंधरा दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. पक्षाध्यक्ष शरद पवार आजारी असल्याने प्रवेश सोहळा लांबणीवर टाकण्यात आला आहे. पोटदुखीचा त्रास असल्याने शरद पवार यांना मुंबईच्या 'ब्रीच कँडी' रूग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. उद्या 31 मार्चला शरद पवार यांच्यावर शस्त्रक्रिया केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर हा पक्षप्रवेश सोहळा पुढे ढकलण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या 'चित्रपट, कला, क्रीडा आणि सांस्कृतिक' विभागाचे प्रदेशाध्यक्ष बाबासाहेब पाटील यांनी 'एबीपी माझा'ला ही माहिती दिली आहे.

 31 मार्चला वैशाली माडे यांचा राष्ट्रवादी काँग्रेसच्या मुंबईतील प्रदेश कार्यालयात पक्षप्रवेश होणार होता. यावेळी खासदार सुप्रिया सुळे यांच्यासह राष्ट्रवादीचे अनेक जेष्ठ नेते उपस्थित राहणार होते. 15 दिवसानंतर माडे यांच्या पक्षप्रवेशाची नवी तारीख जाहीर करणार असल्याचं राष्ट्रवादीच्या सूत्रांनी जाहीर केलं आहे.  सुप्रसिद्ध गायिका वैशाली माडे या वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटच्या आहेत.एका सर्वसामान्य घरातील मुलगी ते चित्रपट सृष्टीतील नामवंत गायिका हा वैशाली यांचा प्रवास अतिशय संघर्षाचा आहे. 'झी' वरील मराठी आणि हिंदी अशा दोन्ही स्पर्धांचं विजेतेपद पटकावल्यानं वैशाली यांचे महाराष्ट्रासह देशभरात चाहते आहेत. वैशाली यांच्या प्रवेशाच्या माध्यमातून विदर्भातील कलाकारांना पक्षाशी जोडण्याचा राष्ट्रवादीचा मानस असल्याची माहिती राष्ट्रवादीतील सूत्रांनी दिली आहे. 

वैशाली माडेंचा मनसे ते राष्ट्रवादी प्रवास : 

 वैशाली माडे यांनी 2019 च्या लोकसभा निवडणुकीपूर्वी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला होता. मनसे चित्रपट सेनेच्या माध्यमातून त्यांचं पहिलं राजकीय पाऊल पडलं होतं. 2019 च्या लोकसभा निवडणुकीसाठी त्यांचं नाव अमरावतीच्या मनसेच्या संभाव्य उमेदवार म्हणून चर्चेत आलं होतं. मात्र, ऐनवेळी मनसेनं अमरावतीत उमेदवार दिला नसल्यानं त्यांचं नाव मागे पडलं. त्यानंतर त्या मनसेपासून दूर गेल्यात. माडे यांचं माहेर अमरावती जिल्ह्यातील भातकुलीचं. वैशाली माडे यांचे चुलतभाऊ हे भातकुली परिसरातील नामांकित राजकीय व्यक्तिमत्त्व राहिले असून, ते भातुकली पंचायत समितीचे सभापती राहिलेत. त्यांचे माहेरचे आडनाव हे भैसने असून, सामाजिक कार्यकर्ते दलितमित्र उत्तमराव भैसने यांच्या त्या नातेवाईक आहेत.

 कोण आहेत वैशाली म्हाडे : 

 वैशाली माडे यांचा एका सुप्रसिद्ध गायिकेपर्यंतचा प्रवास मोठ्या संघर्षासह अनेक चढ-उतारांचा राहिला आहे. त्यांचा जन्म अमरावती जिल्ह्यातील खार तळेगाव येथे झाला आहे. त्यांचं माहेरचं नाव वैशाली भैसने. बालपणी गरिबीमूळे त्यांना अनेक हाल-अपेष्टा सहन कराव्या लागल्यात. मात्र, याही परिस्थितीत त्यांनी त्यांच्यातील गायिका जीवंत ठेवली. पुढे त्यांचं लग्न वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाटचे अनंत माडे यांच्याशी झालं. त्यांच्या या प्रवासात त्यांच्या पतीचाही मोठा वाटा आहे.

'सारेगमप'नं बदलवलं आयुष्य: 

  वैशाली माडे या 2008 मध्ये 'झी मराठी'च्या मराठी 'सा रे ग म प'च्या पर्वाच्या विजेत्या ठरल्यात. हाच त्यांच्या आयुष्याचा 'टर्निंग पाँईंट' ठरला. येथून पुढे 2009 मध्ये त्यांनी 'झी'च्या हिंदी 'सा रे ग म प'मध्ये आपलं नशिब आजमावलं. यात त्या सौमेन नंदी, यशिता यशपाल यांच्यासह 'टॉप थ्री'मध्ये पोहोचल्यात. पुढे आपल्या जादूई आवाजाच्या बळावर त्यांनी 'सा रे ग म प' च्या हिंदी पर्वातही बाजी मारत संगीत जगताला आपल्या अस्तित्व आणि कर्तृत्वाची जाणीव करून दिली. पुढे यानंतर त्यांना मागे वळून पहावंच लागलं नाही. 

 अनेक हिंदी, मराठी गीतांनी दिली नवी ओळख : 

गेल्या दशकभरात अनेक हिंदी-मराठी गाण्यांतून त्यांनी आपला आवाज अजरामर केला आहे. त्यातील काही महत्वाचे चित्रपट खालीलप्रमाणे आहेत. याशिवाय अनेक मराठी मालिकांची 'टायटल साँग' म्हाडे यांनी गायिली आहेत. यामध्ये 'झी मराठी'वरील 'कुलवधू', 'होणार सुन मी या घरची', 'माझ्या  नवऱ्याची बायको' या मालिकांचा समावेश आहे.

वैशाली माडेंनी गाणे गायलेले चित्रपट : 

मराठी चित्रपट : 
इरादा पक्का (2010)
मध्यमवर्ग (2014)
हंटर्र (2015)
कॅरी ऑन (2015)
31 दिवस (2018)
रणांगण (2018)
आटपाडी नाईट्स (2019)

हिंदी चित्रपट : 

दमादम्म (2011)
बाजीराव मस्तानी : (2015)
अंग्रेजी में कहते है : (2017)
कलंक : (2019)

 पुरस्कार : 

वैशाली म्हाडे यांना त्यांच्या गीतांसाठी अनेक प्रतिष्ठेच्या पुरस्कारांसाठी नामांकन मिळाले. तर अनेक नामवंत पुरस्कारांनी त्यांना गौरविण्यात आलं आहे.

1) स्क्रीन अवॉर्ड : चित्रपट - कलंक, वर्ष - 2019, गीत - घर म्होरे परदेसीया. (श्रेया घोषालसह)
2) झी सिने अवॉर्ड : चित्रपट - कलंक, वर्ष - 2020, गीत - घर म्होरे परदेसीया. (श्रेया घोषालसह)

नामांकन : 

1) 'मिर्ची म्युझिक अवॉर्ड  : चित्रपट - 'बाजीराव मस्तानी' : वर्ष - 2015, गीत - पिंगा (श्रेया घोषालसह)

2) फिल्मफेअर अवॉर्ड : चित्रपट - कलंक, वर्ष - 2020, गीत - घर म्होरे परदेसीया. (श्रेया घोषालसह)

 राजकीय 'इनिंग'साठी राष्ट्रवादीचीच निवड का? : 

गेल्या काही दिवसांत राष्ट्रवादीनं आपली चित्रपट आणि सांस्कृतिक आघाडी अधिक सक्षम करण्यासाठी जाणीवपूर्वक प्रयत्न सुरू केले आहेत. या आघाडीच्या माध्यमातून जनमाणसात अधिक ताकदीने जाण्याचा राष्ट्रवादीचा मानस आहे. माडे हा पक्षाचं संघटन काहीसं कमकुवत असलेल्या विदर्भाचं प्रतिनिधित्व करतात. शिवाय त्यांची पार्श्वभूमी ही संघर्ष आणि वंचित समाजातील असल्याने येथे पुढे काम करण्यास स्कोप मिळू शकतो. गेल्या अनेक दिवसांत अनेक दिग्गज मराठी कलाकारांनी राष्ट्रवादीच्या चित्रपट आघाडीत प्रवेश केला आहे. माडे यांनी प्रवेश करावा यासाठी दोन ते तिन महिन्यांपासून प्रयत्न सुरू होते. अखेरीस माडे यांच्या होकारानं आता त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Team India Victory Parade : विश्वविजेत्यांची विजयी मिरवणूक, हजारोंच्या संख्येने चाहत्यांची गर्दीAshish Shelar And Rohit Pawar : रोहित पवारांसाठी आशिष शेलार धावले; 'हिटमॅन'ला थांबवलं अन् फोटो काढलाRohit Sharma Meet Family : विजयानंतर रोहित शर्मा आईवडीलांना पहिल्यांदा भेटतो तेव्हा...Ajit Pawar Special Report : बजेटवरुन टीका; अजितदादांचं सडेतोड उत्तर

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
Rohit Sharma : रोहित शर्माकडून हार्दिक पांड्याचे कौतुक, म्हणाला...
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
राज्यसभेत मोदींचे टेन्शन वाढलं; CAA, तीन तलाक, कलम 370 वर भाजपमागे खंबीर असलेल्या पक्षाने साथ सोडली
Virat Kohli Video : फ्लाईंग किस, ह्रदयावर हात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
फ्लाईंग किस, ह्रदयावर हात, क्या बात; किंग कोहलीचा अनोखा स्वॅग, चाहते भारावले
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
Video : मुंबईच्या गर्दीत धक्काबुक्की, काहींचा श्वास गुदमरला, रुग्णालयात दाखल; व्हिडिओ व्हायरल
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
मुंबईत विक्रमी गर्दी,मोठा उत्साह; फडणवीसांकडून टीम इंडियाचं स्वागत, क्रिकेट फॅन्सना विनंती
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
ओढ्यात करंट उतरल्याने 24 म्हशींचा मृत्यू ; सोलापूरच्या ग्रामस्थांमध्ये हळहळ, पशुपालकाचं मोठं नुकसान
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
शिंदे सरकारने पेटारा उघडला, विश्वविजेत्या खेळाडूंसाठी मोठं बक्षीस जाहीर!
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
पुणेकरांना गुडन्यूज! लाडक्या बहिणींसाठी केवळ 100 रुपयांत बँक खातं उघडा; डीसीसीचा महत्त्वपूर्ण निर्णय
Embed widget