एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
नगर पोलिसांचा चकवा, छिंदमला येरवाड्याला सांगून नाशिक जेलमध्ये नेले!
नगर उपकारागृहातून छिंदमला बाहेर काढताना,उपकारागृहाच्या परिसरातील लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. कुणालाही कळू न देता छिंदमला नाशिक कारागृहात नेण्यात आले.
अहमदनगर : अहमदनगरच्या उपमहापौरपदावरुन हकालपट्टी करण्यात आलेल्या श्रीपाद छिंदमला नगर उपकारागृहातून नाशिक कारागृहात हलवण्यात आले आहे. छिंदम याने महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर त्याला अटक करण्यात आली.
विशेष म्हणजे, छिंदमविरोधात लोकांचा संताप पाहता, अत्यंत गुपचूपपणे नगरहून नाशिक कारागृहाच्या दिशेने नेण्यात आले. येरवाडा कारागृहात छिंदमला हलवलं जात असल्याचे सांगून, पोलिसांनी ऐनवेळी गाडी बदलली आणि नाशिककडे नेले. त्याला आता नाशिकच्या कारागृहात ठेवण्यात येणार आहे.
नगर उपकारागृहातून छिंदमला बाहेर काढताना,उपकारागृहाच्या परिसरातील लाईट्स बंद करण्यात आल्या होत्या. कुणालाही कळू न देता छिंदमला नाशिक कारागृहात नेण्यात आले.
काय आहे प्रकरण?
श्रीपाद छिंदमने एका कामासंदर्भात बांधकाम विभागाचे कर्मचारी अशोक बिडवे यांना फोन केला. यावेळी बोलताना छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरले. छिंदमने महाराजांबद्दल वापरलेल्या आक्षेपार्ह वक्तव्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. त्यानंतर सर्वच स्तरातून छिंदमवर टीका सुरु झाली. काल (16 फेब्रुवारी) श्रीपाद छिंदम याला पोलिसांनी अटक केली.
छिंदमवर भाजपची कारवाई
“शिवजयंती आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबाबत उपमहापौर श्रीपाद छिंदम यांच्या आक्षेपार्ह वक्तव्याचा निषेध करतो. छिंदम यांना पक्षातून बडतर्फ करण्यात आले आहे. छिंदम यांची उपमहापौर पदावरुनही हकालपट्टी करण्यात आली आहे.” अशी माहिती भाजपचे नेते आणि अहमदनगरचे खासदार दिलीप गांधी यांनी दिली.
संबंधित बातम्या :
शिवप्रेमींच्या भावना दुखावल्या, माफी मागतो, प्रायश्चित्तास तयार : छिंदम
शिवरायांबद्दल अपशब्द काढणाऱ्याला महाराष्ट्रातून हद्दपार करा : संभाजीराजे
श्रीपाद छिंदमला 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी
शिवरायांबद्दल अपशब्द वापरणारा छिंदम अटकेत
नगरच्या उपमहापौरांचं शिवरायांबाबत आक्षेपार्ह वक्तव्य
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
निवडणूक
क्रीडा
महाराष्ट्र
Advertisement