Buldhana News : पोलिसांकडे तक्रार करूनही कारवाई न केल्याचा पीडित महिलेचा संताप; चक्क पोलीस निरीक्षकांचीच केली आरती
Buldhana News : तक्रार करून देखील पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्याच्या रागातून एका संतप्त महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठत हातात आरतीचे ताट घेऊन चक्क पोलीस निरीक्षकांचीच आरती केल्याचा प्रकार समोर आलाय.
Buldhana News बुलढाणा : बुलढाणा जिल्ह्यातील मलकापूर येथे एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. यात मलकापूर शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने एका मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप एका मुलाच्या आईने केला आहे. परिणामी याबाबत रितसर तक्रार देखील पोलिसांकडे करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणीही केली. मात्र, एक महिन्याचा अवधी होऊनही पोलिसांनी कुठलीही कारवाई या डॉक्टर विरोधात केली नाही. तसेच गुन्हाही नोंदवला नाही. परिणामी संतप्त महिलेने थेट पोलीस स्टेशन गाठत हातात आरतीचे ताट घेऊन चक्क पोलीस निरीक्षकांचीच आरती केल्याचा प्रकार समोर आला आहे. या प्रकरणामुळे पोलीस प्रशासनासह परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
चक्क पोलीस निरीक्षकांचीच केली आरती
मलकापूर शहरातील एका प्रख्यात डॉक्टरांनी चुकीचे उपचार केल्याने आपल्या मुलाचा पाय कायमचा जायबंदी झाल्याचा आरोप करत या डॉक्टरवर कारवाई करण्याची मागणी मलकापूर शहरातील एका महिलेने केली होती. मात्र एक महिना होऊनही पोलिसांनी कुठलीही कारवाई या डॉक्टर विरोधात केली नसल्याने आणि गुन्हाही नोंदवला नसल्याने या पीडित महिलेने चक्क पोलीस निरीक्षकांच्या दालनात जाऊन त्यांची आरती केली. काल रात्री संबंधित महिलेने पोलीस स्टेशन गाठत हातात आरतीचे ताट घेऊन थेट ठाणेदार अनिल गोपाळ यांच्या दालनात शिरल्या.
मी दिलेल्या तक्रारीची अद्याप दखल न घेता कुठलीही कारवाई केली नसल्याचे जाब विचारत त्यांनी ठाणेदाराची चक्क आरतीच उतरवली. यामुळे भांबावलेल्या ठाणेदारांनी पुढील दोन दिवसात यावर ठोस कारवाई करतो, असे उत्तर देऊन आक्रमक महिलेला शांत केले. मात्र या महिलेने उचललेल्या पावलाची जिल्हाभरात चांगलीच चर्चा होत आहे.
अंगणात कपडे धुत असलेल्या महिलेला भरधाव ट्रेकटरने चिरडले
घराच्या अंगणात कपडे धुत असलेल्या महिलेला एका भरधाव ट्रॅक्टरने चिरडल्याची घटना घडलीय. ही घटना गोंदिया जिल्ह्यातील आमगाव तालुक्यातील किडंगीपार येथे घडली. किसना बुधराम चोरवाडे (58) असे मृत महिलेचे नाव आहे. मृतक महीला आपल्या घरासमोर कपडे धुत असताना अचानक समोरून संदीप कोरे हा ट्रॅक्टर चालवीत आपल्या शेतातून धान घेऊन येत होता.
मद्यधुंद अवस्थेमध्ये असलेल्या संदीपचे त्याच्या ट्रॅक्टरवरील नियंत्रण सुटलं आणि चक्क किसनाबाई यांच्या घराच्या अंगणात ट्रॅक्टर गेलं. त्यानंतर त्या ट्रॅक्टरच्या चाकामध्ये येऊन किसनाबाई यांचा जागेवरच मृत्यु झाला. या घटनेची नोंद आमगाव पोलिसात करण्यात आली असून आमगाव पोलीस पुढील तपास करीत आहे.
इतर महत्वाच्या बातम्या