नारायण राणेंची मेडिकल तपासणी करावी, शिवसेना नेत्यांचा राणेंवर पलटवार
शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा राणे आहे. त्यामुळे ज्याच्या मनातच पाप आहे त्याच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा काय करणार. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी राणेंचा समाचार घेतला.
मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या दसरा मेळाव्यातील भाषणावर भाजप खासदार नारायण राणे यांनी सडकून टीका केली आहे. नारायण राणेंच्या टीकेला आता शिवसेना नेत्यांना उत्तर दिलं आहे. राज्याच्या मुख्यमंत्र्याविषयी असा एकेरी उल्लेख करणे महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला शोभणारं नसल्याचं शिवसेना नेत्यांनी म्हटलं.
नारायण राणेंची मेडिकल तपासणी करावी- दादा भुसे
नारायण राणे यांचा इतिहास भुगोल सर्वांना माहिती आहे. नारायण राणेंचे पत्रकार परिषदेतील हावभाव, बोलणं बघता त्यांची मेडिकल तपासणी करावी, असा टोला दादा भुसे यांनी लगावला. राणेंचं वय आणि आदित्य ठाकरेंचं वय यामध्ये अंतर जरी असलं तरी नारायण राणेंनी आदित्य ठाकरेंकडून शिकले पाहिजे. संयम कसा बाळगायचा हे आदित्य ठाकरेंनी दाखवून दिलं आहे.बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही- उदय सामंत
महाराष्ट्राच्या राजकीय संस्कृतीला हे शोभणारं नाही. मुख्यमंत्र्यांचा एकेरी उल्लेख करायला नाही पाहिजे. महाराष्ट्राला एक राजकीय इतिहास आहे. मराठा आरक्षणाच्याबाबतीत सरकार गंभीर आहे. पण 15 आमदार निवडून येणार किंवा सरकार पडणार असं बोललं जात होतं. आजच्या पत्रकार परिषदेनंतर महाराष्ट्र ठरवेल उद्धव ठाकरेंच्या पाठीमागे ठामपणे उभं राहायचं.राणेंची एनसीबीकडून चौकशी झाली पाहिजे- अर्जुन खोतकर
वाल्मिकीचा राणे पुन्हा वाल्या झाल्याची परखड टीका शिवसेनेचे अर्जुन खोतकर यांनी राणेंवर केली. नारायण राणेंनी पत्रकार परिषद घेवून मुख्यमंत्र्यांविषयी अर्वाच्य भाषेत टीका केली. शिवसेना पक्षप्रमुखांच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा राणे आहे. त्यामुळे ज्याच्या मनातच पाप आहे त्याच्याकडून चांगल्या भाषेची अपेक्षा काय करणार. अशा शब्दात अर्जुन खोतकर यांनी राणेंचा समाचार घेतला. त्याचबरोबर ज्या भाषेत ते बोलत होते, त्यामुळे दिल्लीतील एनसीबीच्या टीम मार्फत त्यांची चौकशी करावी, असा खोचक टोलाही खोतकरांनी लगावला.
Shivsena Dussehra Melava : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान
NARAYAN RANE | कुणाला बेडुक म्हणतो? उद्धव ठाकरेच पुळचट, नारायण राणेंची मुख्यमंत्र्यांवर जोरदार टीका