एक्स्प्लोर

बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन मुख्यमंत्रीपद मिळवलं, नारायण राणेंची उद्धव ठाकरेंवर टीका

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधानांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही, अशी टोकाची टीका नारायण राणेंनी केली.

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दसरा मेळाव्यात केलेल्या भाषणावर भाजप खासदार नारायण राणे यांनी टीका केली आहे. आतापर्यंतच्या मुख्यमंत्र्यांनी आपल्या भाषणाच्या शैलीने स्वतःची प्रतिष्ठा राखली, त्याचा काल अभाव जाणवला. निर्बुद्ध शिवराळ बरळणं म्हणजे कालचं मुख्यमंत्र्यांचं भाषण होतं, अशी टीका नारायण राणेंनी केली. कालच्या भाषणात एकाही विकास कामाचा उल्लेख नाही, कोरोनाचा उल्लेख नाही. जवळपास 43 हजार रुग्ण महाराष्ट्रात मृत्यूमुखी पडले. याची नैतिक जबाबदारी मुख्यमंत्र्यांवर येत नाही का? असा सवालही नारायण राणेंनी उपस्थित केला.

मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंना जनाची नाही तर मनाची वाटली पाहिजे. मुख्यमंत्री पदाला हा माणूस लायक नाही. पंतप्रधानांच्या कामावर बोलण्याची त्यांची लायकी नाही. काय बोलतोय हे त्यांना कळत नाही. राज्यात 16 हजार कोटींचे उद्योग आणल्याचा उल्लेख केला तो फक्त कागदावर आहे, बेकारीचा उल्लेखच नाही, असं नारायण राणेंनी म्हटलं.

बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं

हिंदुत्वावर बोलण्याचा यांना बोलण्याचा अधिकार आणि नैतिकता नाही. यांचे 56 आमदार नरेंद्र मोदींच्या नावावर आलेत, नाहीतर 25 पण आले नसते. बेईमानी करून, हिंदुत्वाला मूठ माती देऊन त्यांनी पद मिळवलं असा माझा आरोप आहे, अशी टीका नारायण राणेंनी केली.

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पुत्राला क्लीन चिट दिलीय

मुख्यमंत्र्यांनी स्वतःच्या पुत्राला क्लीन चिट दिलीय, पण आजही म्हणतो सुशांत सिंग राजपूतचा खून झाला आहे. त्यातील आरोपी गजाआड जातील, त्यात एक मंत्री, त्यांचा मुलगा पण असेल. सीबीआयने अजून केस बंद केलेली नाही, असं नारायण राणे यांनी म्हटलं.

शिवसेनेला सत्तेत आणून बसवलं कारण आम्ही वाघ होतो

उद्धव ठाकरेंनी स्वतःच्या जीवावर एकही काम आजपर्यंत पूर्ण केलेलं नाही. आम्ही वाघ आहोत म्हणे, कोणी सांगितलं वाघ आहे. पिंजऱ्यातला वाघ आहे की बाहेरचा ते पण स्पष्ट करा. शिवसेनेला सत्तेत आणून बसवलं कारण आम्ही वाघ होतो, बेडूक म्हणून नाही. उद्धव ठाकरे म्हणजे पुळचट माणूस. आमच्यावर बोललात तर याद राखा, 39 वर्षात जे काही पाहिलं ते सर्व बाहेर काढेन, असा इशाराही नारायण राणेंनी दिला.

मराठ्यांना आरक्षण हा माणूस देऊ शकत नाही. मराठ्यांचा द्वेष करणारा हा माणूस आहे. मनगटात ताकद आहे म्हणून आम्ही आरक्षण दिलं. संजय राऊत म्हणताच सरकार 5 वर्षे पूर्ण करणार, यांचे 56 आमदार आणि पुन्हा बोलतात आमचं सरकार पाडा. इथं शिवसेनेच्या आमदारांची कामं होत नाहीत, त्यांच्यात असंतोष आहे, पुढच्या वेळी 15 आमदार येणार नाहीत, असं भाकीतही नारायण राणेंनी केलं.

Shivsena Dussehra Melava : हिंमत असेल तर सरकार पाडून दाखवा, उद्धव ठाकरेंचं विरोधकांना आव्हान

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Muharram: श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच आनंदाश्रू, माय-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच आनंदाश्रू, माय-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
Shivani Baokar Latest News :  शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
Marathi Movies Updates :  सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये सांगणार  परिपक्व नातेसंबंधाची गोड गोष्ट
सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये सांगणार परिपक्व नातेसंबंधाची गोड गोष्ट
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Chhagan Bhujbal On Sharad Pawar : ओबीसींना आरक्षण देण्यात पवारांची भूमिका होती- छगन भुजबळPooja Khedkar Update News : पूजा खेडकरांच्या दिव्यांग प्रमाणपत्रांची माहिती माझाच्या हातीSambhaji Raje Kolhapur News : संभाजीराजे छत्रपतींसह 500 हून अधिक जणांविरोधात गुन्हा; विशालगड तोडफोड प्रकरणABP Majha Headlines 02 PM एबीपी माझा हेडलाईन्स  02 PM 15 July 2024 Marathi News

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Muharram: श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
श्रद्धेपोटी भाविकांची अग्निपरीक्षा; नांदेडमध्ये मोहरमच्या सवारीत निखाऱ्यावर चालण्याचा प्रकार, 'अंनिस' चा आक्षेप
वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच आनंदाश्रू, माय-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
वडिलांचं निधन, आईने भाजी विकून शिकवलं; मुलगा सीए होताच आनंदाश्रू, माय-लेकाच्या भेटीचा व्हिडिओ व्हायरल
Shivani Baokar Latest News :  शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
शिवानी बावकर उतरणार कॉलेज राजकारणाच्या आखाड्यात, 'नेता गीता'मध्ये उलगडणार राजकारण ते प्रेम प्रकरणाचा प्रवास
Marathi Movies Updates :  सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये सांगणार  परिपक्व नातेसंबंधाची गोड गोष्ट
सुबोध भावे आणि तेजश्री प्रधान पहिल्यांदाच एकत्र झळकणार, 'हॅशटॅग तदेव लग्नम'मध्ये सांगणार परिपक्व नातेसंबंधाची गोड गोष्ट
Chhagan Bhujbal: ना अजित पवार, ना सुनील तटकरे, पवारांच्या भेटीला जाताना भुजबळांनी कुणाला सांगितलं?
ना अजित पवार, ना सुनील तटकरे, पवारांच्या भेटीला जाताना भुजबळांनी कुणाला सांगितलं?
Chhagan Bhujbal : दीड तासांनी अवघी 15 मिनिटे भेट अन् छगन भुजबळांनी विषय काढताच शरद पवारांचा पहिला प्रतिप्रश्न! भुजबळांनी काय उत्तर दिलं?
दीड तासांनी अवघी 15 मिनिटे भेट अन् छगन भुजबळांनी विषय काढताच शरद पवारांचा पहिला प्रतिप्रश्न! भुजबळांनी काय उत्तर दिलं?
Chhagan Bhujbal: आम्ही मंत्री झालो, मुख्यमंत्री झालो तरीही आमचा अभ्यास तुमच्यापेक्षा जास्त नाही, गावगाड्याची जास्त माहिती तुम्हालाच; छगन भुजबळांचं शरद पवारांना आर्जव
मंत्री-मुख्यमंत्री झालो म्हणजे सगळं कळतं असं नाही, गावगाड्याची तुम्हाला जास्त माहिती, भुजबळांचं पवारांना आर्जव
Mumbai Local : एवढी मस्ती कशाला पाहिजे? धावत्या लोकलला लटकून तरूणाचा जीवघेणा स्टंट; Video Viral
एवढी मस्ती कशाला पाहिजे? धावत्या लोकलला लटकून तरूणाचा जीवघेणा स्टंट; Video Viral
Embed widget