एक्स्प्लोर
शिवसेनेचे माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक
औरंगाबादेतील हिंसाचारातील आरोपी सोडण्याच्या मागणीवरून प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
औरंगाबाद : पोलीस स्टेशनमध्ये घुसून मारहाण केल्याप्रकरणी शिवसेनेचे औरंगाबादमधील माजी आमदार प्रदीप जयस्वाल यांना अटक करण्यात आली आहे. औरंगाबादेतील हिंसाचारातील आरोपी सोडण्याच्या मागणीवरून प्रदीप जयस्वाल यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय.
शहरातील क्रांती चौक पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. प्रदीप जयस्वाल यांनी क्रांती चौक पोलीस ठाण्यात रात्री 11 ते 12 च्या दरम्यान गोंधळ घातला. त्यांनी पोलीस ठाण्यात तोडफोड केल्याचा दावा पोलिसांनी केला.
औरंगाबाद हिंसाचार प्रकरणात क्रांती चौक पोलीसांनी गांधीनगर भागातील दोन जणांना ताब्यात घेऊन पोलीस स्टेशला आणलं. त्यावेळी प्रदीप जयस्वालही ठाण्यात पोहोचले आणि त्यांनी या अटक केलेल्या दोघांची जामिनावर सुटका करण्याची मागणी केली.
यावरुन प्रदीप जयस्वाल यांनी पोलीसांना शिवागाळ केल्याचंही फिर्यादीत म्हटलं आहे. त्यांनी पोलीस ठाण्यातील ठाणे अमलदाच्या टेबलवरील काच फोडली आणि खुर्च्यांची फेकाफेक केल्याचाही त्यांचावर आरोप आहे. त्यामुळे जयस्वाल यांच्या विरोधात शासकीय कामात अडथळा आणणे, शिवीगाळ करणे, ऑफिसची तोडफोड करणे या कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.
दरम्यान, प्रदीप जयस्वाल यांनी मात्र हे सगळे आरोप फोटाळले आहेत. आपण टेबलावरील पेन पॅड ठेवला आणि काचेला तडा गेल्याचं म्हटलं आहे. शिवाय खुर्च्यांच्या फेकाफेक केली नसल्याचं म्हटल आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
रायगड
Advertisement