एक्स्प्लोर
Advertisement
कचराप्रश्नी कोल्हापुरात शिवसेनेचं अनोखं आंदोलन!
कोल्हापूर : मुंबई आणि पुण्यापाठोपाठ आता कोल्हापुरातही कचऱ्याचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. शहरातील लोक कचराप्रश्नी आक्रमक होताना दिसत आहेत. या प्रश्नावर शिवसेनेने कोल्हापुरात अनोखं आंदोलन करत प्रशासनाला जागं करण्याचा प्रयत्न केला.
कोल्हापूर महापालिकेतील सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शहरातील कचऱ्याप्रश्नी संवेदनशील नसल्याचा आरोप करत शिवसेनेने आक्रमक होत आंदोलन केलं.
कसबा बावडा परिसरात कचऱ्याचे डोंगराएवढे ढीग सध्या रचून ठेवले जात आहेत. या प्रश्नी महापालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाचे अधिकारी जबाबदार असल्याचा ठपका शिवसेनेने ठेवला आहे.
शिवसेनेच्या नेत्यांनी कसबा बावडा परिसरातील कचऱ्याच्या ढिगाची पाहणी केली. यावेळी उपस्थित असणारे महापालिकेचे अधिकारी आणि प्रदूषण नियंत्रण महामंडळाच्या अधिकाऱ्यांनी समाधानकारक उत्तरं दिली नाहीत.
त्यानंतर शिवसेनेने घोषणाबाजी सुरु केली आणि कचऱ्याची पोती घेऊन थेट प्रदूषण नियंत्रण महामंडळाचं ऑफिस गाठलं. सर्व कचरा कार्यालयातच टाकला. यावेळी शिवसेनेने महापालिका आयुक्तांवर खटला दाखल करण्याची मागणी केली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
निवडणूक
मुंबई
निवडणूक
Advertisement