lata mangeshkar passed away : प्रभुकुंज बाहेरील पारंपारीक 'आकाशकंदील', नगरसेवक अरविंद भोसलेंनी शेअर केला खास अनुभव
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांचे आज निधन झाले. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक अरविंद भोसलेंनी लतादीदींसोबतचा एक खास अनुभव शेअर केला आहे.
lata mangeshkar passed away : गानसम्राज्ञी भारतरत्न लता मंगेशकर (lata mangeshkar) यांचे आज सकाळी 8 वाजून 12 मिनिटांनी निधन झाले. वयाच्या 93 व्या वर्षी लतादीदींनी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या निधनानंतर विविध स्तरातून शोक व्यक्त होत आहे. लतादीदींच्या निधनानंतर शिवसेनेचे स्विकृत नगरसेवक अरविंद भोसले यांनी लतादीदींसोबतचा एक खास अनुभव शेअर केला आहे. दिवाळी सणाला घराबाहेर लावण्यात येण्याऱ्या आकाशकंदीला संदर्भातील हा अनुभव अरविंद भोसले यांनी शेअर केला आहे.
दिवाळीत आपल्या दारात आकाशकंदील लावायची आपली परंपरा आहे. त्यामुळं इतरांप्रमाणे आम्ही मित्रपरिवार मागील काही वर्षांपासून सातत्याने पारंपरिक पद्धतीने आकाशकंदील बनवून दिवाळीच्या निमित्ताने मुंबईत काही देवदेवतांच्या मंदिरात, मठ आणि काही मान्यवरांच्या घरी जाऊन अर्पण करतो. त्या प्रत्येक आकाशकंदिलाची सजावट आणि रंगसंगती दिवाळीच्या पवित्र वातावरणात मन आणखी प्रसन्न करतात. त्याची पोचपावती आम्हाला अनेकवेळा मिळाली. त्यातला एक प्रसंग असा, की महालक्ष्मी येथील 'प्रभुकुंज' या मंगेशकर कुटुंबियांच्या निवासस्थानी आकाशकंदील लावल्यावर प्रचंड आनंद आणि मानसिक समाधान मिळायला लागले असे अरविंद भोसलेंनी म्हटले आहे.
काही वर्षांपूर्वी जेव्हा पहिल्यांदा लतादीदींच्या निवासस्थानी पारंपरिक आकाशकंदील पाठवले. त्यावेळी त्यांना आवडतील की नाही म्हणून त्यांच्या कर्मचाऱ्यांनी ते दर्शनी भागात लावले नाहीत. त्यांनी बाजारपेठेतून नेहमीचे आकाशकंदील आणून लावले आणि आम्ही पाठवलेले आकाशकंदील दर्शनी भागात न लावता अन्य ठिकाणी लावले. काही वेळाने ते पारंपरिक आकाशकंदील लतादीदींच्या नजरेस पडले आणि त्यांनी कर्मचाऱ्यांना विचारले हे आकाशकंदील कुठून आणले? असे आणखीन मिळतील का बघा. आपण देवघर आणि घराच्या दर्शनी भागात लावूया. साक्षात लतादीदींकडूनच ही सूचना आल्यावर त्या व्यक्तीची तारांबळ उडाली. त्यांनी मला संपर्क साधला आणि झालेला प्रकार मला सांगितला. मी त्यांची तळमळ पाहून त्वरित आणखी पारंपरिक आकाशकंदिलांची व्यवस्था केली. त्यावर्षीपासून दैवी मंगेशकर कुटुंबियांच्या निवासस्थानी आम्ही पारंपरिक पद्धतीने बनवलेले आकाशकंदील घेऊन जातो असा खास अनुभव अनिल भोसले यांनी शेअर केला आहे. आकाशकंदील बनवयाची प्रक्रिया त्यांनी समजून घेतली. दिवाळीच्या आकाशकंदिलाच्या निमित्ताने मला लतादीदींना भेटता आलं. बारीकसारीक गोष्टींमध्येही आनंद आणि समाधान शोधणारे दैवी अवतार किती महान असतात याचा अनुभव मला आल्याचे अरविंद भोसले यांनी सांगितले.
महत्त्वाच्या बातम्या: