एक्स्प्लोर
Advertisement
फडणवीसांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प, त्यामुळेच महाराष्ट्रानं नाकारलं; शरद पवारांची बोचरी टीका
देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक भाषणांमध्ये असं जावणतं की, त्यांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांना नाकारलं, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली.
मुंबई : महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अनेक भाषणांमध्ये असं जावणतं की, त्यांच्या तोंडी 'मी'पणाचा दर्प आहे. त्यामुळेच महाराष्ट्राने त्यांना नाकारलं, अशी बोचरी टीका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शरद पवार यांनी केली. एबीपी माझाचे संपादक राजीव खांडेकर यांनी आज नवी दिल्ली येथे शरद पवारांची मुलाखत घेतली. या मुलाखतीमध्ये पवारांनी राज्याच्या राजकारणात गेल्या काही दिवसात घडलेल्या अनेक गोष्टींवर भाष्य केले.
शरद पवार म्हणाले की, निवडणुकीच्या प्रचारादरम्यानची देवेंद्र फडणवीसांची भाषणं पाहा. त्यांनी भाषणांमधून अनेक गोष्टी सांगितल्या. ते म्हणाले की मी पुन्हा येईन, शरद पवार हे इतिहासजमा झाले आहेत. आता केवळ माझं नाव आहे. यामध्ये फडणवीसांचा 'मी'पणा जाणवतो.
पवार म्हणाले की, मागील निवडणुकीत जनतेने भाजपच्या बाजूने कौल दिला होता. ते सत्तेत होते. लोकांचा असा पाठिंबा मिळाल्यानंतर आपण पक्षवाढीसाठी काम करायचं असतं. परंतु त्यांनी केलेल्या वक्तव्यांमध्ये 'मी'पणाचा दर्प जाणवतो. त्यांची भाषण पाहा. त्यात सत्तेचा दर्प होता. मी म्हणजे सर्व काही, बाकीचे सगळे तुच्छ आहेत, असा अविर्भाव होता. महाराष्ट्रातील जनतेला हे आवडत नाही, त्यांना 'मी'पणा आवडत नाही. त्यांना विनम्रता आवडते.
फडणवीस अजूनही होते तिथेच
शरद पवार म्हणाले की, फडणवीस पाच वर्ष मुख्यमंत्री होते, परंतु राज्याच्या राजकारणात त्यांना मोठं स्थान निर्माण करता आलं नाही. ते अजून तिथेच आहेत. मी म्हणजे महाराष्ट्र, मी म्हणेल तोच महाराष्ट्र ही त्यांची भूमिका राज्यातील जनतेला मान्य नाही. त्यांच्या पक्षाला सर्वात मोठा पक्ष म्हणून जनतेने कौल दिला. परंतु त्याचं श्रेय फडणवीसांना जात नाही. त्यामागे मोदींचा चेहरा आहे.
फडणवीसांवर भाजपचे राज्यासह दिल्लीतले नेते नाराज
शरद पवार यांनी सांगितले की, फडणवीस यांच्यावर भाजपचे राज्यातले नेते नाराज आहेत. आज मी दिल्लीत भाजपच्या अनेक नेत्यांना भेटलो, चर्चा झाल्या. त्यामधून मला एक गोष्ट कळली आहे की, फडणवीसांवर भाजपचे दिल्लीतले अनेक नेतेदेखील नाराज आहेत.
वाचा : अजित पवारांनी 'त्या' अटीवर भाजपशी हातमिळवणी केली होती : शरद पवार
वाचा : शिवसेनेसोबत आघाडी करण्यासाठी सोनिया गांधींना 'या' गोष्टींची आठवण करुन दिली : शरद पवार
80 तास आणि शरद पवारांचा पॉवर प्ले! | ABP Majha
VIDEO पाहा : वय 79, पायाला दुखापत, तरीही शरद पवारांचा जज्बा कायम
अजित पवार म्हणतात मी बंड केलं नव्हतं
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
निवडणूक
कोल्हापूर
निवडणूक
निवडणूक
Advertisement