(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sharad Pawar : शरद पवारांविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट; नाशिकचा तरुण पोलिसांच्या ताब्यात
Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
Sharad Pawar News : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरुद्ध आक्षेपार्ह ट्वीट करणाऱ्या युवकाला पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. शरद पवार यांच्याविरुद्ध निखिल भामरे नावाच्या तरुणानं आक्षेपार्ह ट्वीट केलं आहे. या तरुणाविरोधात कारवाई करावी असं ट्वीट मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी केलं होतं. यानंतर निखिल भामरेला चौकशीसाठी पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. गृहनिर्माण मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी कारवाईची मागणी केली होती. या प्रकरणी दिंडोरी पोलिसांकडून चौकशी सुरू आहे. आणखी काही आक्षेपार्ह मजकूर निखिलच्या मोबाईलमध्ये आढळल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे.
काय आहे ट्विट
जितेंद्र आव्हाड यांनी शेअर केलेल्या निखिल भामरेच्या ट्वीटच्या स्क्रिनशॉमध्ये 'वेळ आहे बारामतीच्या गांधीसाठी, बारामतीचा नथुराम गोडसे तयार करण्याची' असा मजकूर लिहिलेला आहे.
काय म्हणाले जितेंद्र आव्हाड
निखिल भामरेच्या ट्विटचा स्क्रिनशॉट शेअर करत जितेंद्र आव्हाड यांनी म्हटलं आहे की, काय पातळी वर हे सगळे होते आहे. या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा. या ट्वीटमध्ये आव्हाडांनी मुंबई, महाराष्ट्र पोलिसांनी टॅग केलं आहे.
काय पातळी वर हे सगळे होते आहे ... ह्या विकृत इसमा विरुद्ध कडक कारवाई करा @MumbaiPolice @CPMumbaiPolice @DGPMaharashtra @PuneCityPolice @ThaneCityPolice pic.twitter.com/WY5TSaKURZ
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) May 13, 2022
शरद पवारांना जीवे मारण्याची धमकी; गुन्हा दाखल
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांना जीवे मारण्याची धमकी देणाऱ्या ट्विटर हँडल विरोधात ठाण्यातील नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ठाण्याचे राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्या तक्रारीनंतर निखिल भामरे या युवकाच्या विरोधात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. कलम 153 कलम 107 कलम 506 अंतर्गत गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.
अभिनेत्री केतकी चितळेचीही वादग्रस्त फेसबुक पोस्ट
अभिनेत्री केतकी चितळे पुन्हा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. तिनं तिच्या फेसबुक अकाउंटवरुन राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याबद्दलची एक आक्षेपार्ह पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टनंतर ती ट्रोल होत असून तिच्यावर मोठ्या प्रमाणात टीका होत आहे. केतकी विरोधात कळव्यात गुन्हा देखील दाखल झाला आहे. केतकीविरुद्ध कळवा पोलिस ठाण्यात कलम 500, 505(2), 501 आणि 153 A अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. राष्ट्रवादीचे पदाधिकारी स्वप्निल नेटके यांनी हा गुन्हा दाखल केला आहे. दरम्यान केतकीला अटक होण्याची देखील शक्यता आहे.
इतर महत्वाच्या बातम्या
Ketaki Chitale : शरद पवारांविषयी आक्षेपार्ह पोस्ट; केतकी चितळेविरोधात गुन्हा दाखल