राज्यात राजकीय घडामोडींना वेग; शरद पवार घेणार एकनाथ शिंदेंची भेट,आठवड्याभरात दुसरी भेट
मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनावर सत्ताधारी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे.
मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार (Sharad Pawar) आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांची भेट घेणार आहेत. आज दुपारी 2 वाजता एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी ही भेट होणार आहे. या भेटीत मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर चर्चा होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर सुरु असलेल्या आंदोलनावर सत्ताधारी महायुती आणि महाविकासआघाडीतील घटक पक्ष आमने सामने आले आहेत. याच पार्श्वभूमीवर शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे बोललं जात आहे. या भेटीत मराठा आरक्षणासह विविध मुद्द्यांवर चर्चा केली जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. आठवड्याभरात ही दुसरी भेट आहे. या आधी 22 जुलैला भेट घेतली होती.
मागील भेटीत मराठा -ओबीसी आरक्षण हा विषय होता. यासोबतच दुधाचा प्रश्न विरोधी पक्षातील नेत्यांच्या कारखान्याला कर्ज न देणे हा विषय होता. शरद पवार मुख्यमंत्री भेटीत कुणाच्या ही कारखान्यावर अन्याय होणार नाही असं आश्वासन दिलं होतं. माञ तरीदेखील राष्ट्रवादी काँग्रेस शरचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक बापू पवार काँग्रेसचे आमदार संग्राम थोपटे आणि विधान परिषदेची निवडणूक लढलेले अपक्ष उमेदवार विवेक कोल्हे यांच्या कारखान्याला कर्ज नाकारण्यात आलं. यावर शरद पवारांनी प्रेमाने सांगून जर मागणी मान्य होत नसतील तर संघर्ष करू अशी भूमिका घेतली होती. त्यानंतर आज मुख्यमंत्री आणि शरद पवार यांची भेट होत आहे.आजच्या भेटीत देखील हा विषय चर्चेला येईल.
शरद पवार घेणार मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची भेट
एकनाथ शिंदे आणि शरद पवार यांची ही भेट मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निवासस्थान असलेल्या वर्षा या बंगल्यावर ही भेट होणार आहे. आज दुपारी 2 वाजता शरद पवार हे एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहेत. या भेटीत माढा लोकसभा मतदारसंघ, पाणी प्रश्न, बारामती तालुक्यातील केलेली शेतीची पाहणी आणि निधी या मुद्द्यांवरही चर्चा होण्याची शक्यता आहे.
राज ठाकरे वर्षा बंगल्यावर
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची त्यांच्या वर्षा निवासस्थानी भेट घेतली. यावेळी मुंबईतील बीडीडी चाळ पुनर्विकास, पोलीस वसाहतींचा पुनर्विकास, घरांची उपलब्धता विविध विषयांवर बैठक आयोजित करण्यात आली होती. यावेळी राज्य प्रशासनातील वरिष्ठ अधिकारीही उपस्थित होते. यावेळी मनसे नेते बाळा नांदगावकर, आमदार राजू पाटील,मनसेचे माजी आमदार नितीन सरदेसाई, प्रवक्ते संदीप देशपांडे, अजित अभ्यंकर, वैभव खेडेकर,अभिजित पानसे आणि इतर पदाधिकारी उपस्थित होते.
हे ही वाचा :