Sharad Pawar : शरद पवारांनी या आधीच कुणबी दाखला काढला? व्हायरल होणाऱ्या OBC दाखल्यामागचं सत्य काय?
Sharad Pawar Viral Caste Certificate : राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियात व्हायरल होत असून त्यामध्ये त्यांच्या जातीचा प्रवर्ग हा ओबीसी (OBC) असल्याचं सांगितलं जातंय.
मुंबई: एकीकडे राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न पेटला असताना दुसरीकडे त्यावरून सुरू असलेलं राजकारण काही थांबायचं नाव घेत नाही. या प्रश्नी आंदोलन करणाऱ्या मनोज जरांगेंनी (Manoj Jarange Protest) सरसकट मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र (Kunbi Certificate) देण्यात यावं, मराठ्यांना ओबीसीमधून आरक्षण (OBC Reservation) देण्यात यावं अशी मागणी केली आहे. त्यातच आता राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या नावाचा एक दाखला सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. व्हायरल होणाऱ्या या दाखल्यात शरद पवारांचा प्रवर्ग हा ओबीसी असल्याचं दाखवण्यात आलं आहे.
शरद पवारांचा ओबीसा नोंद असलेला दाखला व्हायरल (Sharad Pawar Viral Caste Certificate)
शरद पवारांनी राज्यात सुरू असलेल्या मराठा आंदोलनाला पाठिंबा देत मराठ्यांना आरक्षण मिळावं यासाठी राज्य सरकारने प्रयत्न करावेत अशी मागणी केली आहे. तर दुसरीकडे मनोज जरांगे यांनी मराठ्यांना कुणबी प्रमाणपत्र मिळावे आणि ओबीसीतून आरक्षण देण्यात यावं अशी मागणी केली आहे. अशात शरद पवारांनी आधीच कुणबी दाखला काढला असून या आधीपासून ते ओबीसी आरक्षणाचा लाभ घेत आहेत असं दाखवण्याचा प्रयत्न केला जात आहे.
हा दाखला फेक ( Sharad Pawar Fake Caste Certificate)
शरद पवारांचा व्हायरल होत असलेला तो दाखला फेक असल्याचं खासदार सुप्रिया सुळे यांनी सांगितलं आहे. हे कुणीतरी जाणूनबुजून करत असल्याचा दावाही त्यांनी केला आहे.
पवारांचा मराठा उल्लेख असलेला दाखला दाखवला (Sharad Pawar School Certificate)
शरद पवारांचा ओबीसी उल्लेख असलेला दाखला जाणूनबुजून संघ आणि भाजप व्हायरल करत असल्याचा आरोप संभाजी ब्रिगेडने केलेला आहे. शरद पवारांचा मराठा असा उल्लेख असलेला दाखला संभाजी ब्रिगेडने (Sambhaji Briged) पुढे आणला आहे. पवारांच्या शाळेतील दाखल्यावर मराठा असा उल्लेख असताना काही जण जाणूनबुजून त्यांना बदनाम करण्याचा प्रयत्न करत आहेत. शरद पवारांच्या शाळेच्या दाखल्यावर ओबीसीचा उल्लेख असलेला दाखला व्हायरल केला जातोय. जे जिजाऊचे वंशज असल्याचं सांगतात त्यांनी हे केलं आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडने केला आहे. या माध्यमातून ओबीसी आणि मराठा संघर्ष निर्माण करण्याचा प्रयत्न आहे असा आरोप संभाजी ब्रिगेडचे विकास पासलकर यांनी केला आहे.
ही बातमी वाचा: