Supriya Sule : अजितदादा बहिणीला काय दिवाळी गिफ्ट देणार? सुप्रिया सुळेंनी स्पष्टच सांगितलं
Ajit Pawar: बारामतीमध्ये एकाच कार्यक्रमात अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र दिसले होते. त्यानंतर आता पवार कुटुंबीयांच्या दिवाळीला अजित पवार उपस्थित राहणार का याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
पुणे: पवार कुटुंबीयांच्या बारामतीतील दिवाळीकडे (Pawar Family Family Diwali Celebration) सर्वांचंच असतं. राष्ट्रवादीतील फुटीनंतर होणाऱ्या या वर्षीच्या पवारांच्या दिवाळीमध्ये अजित पवार (Ajit Pawar) सहभागी होणार का नाही याची उत्सुकताही सर्वांनाच लागली आहे. त्यातच शनिवारच्या एका कार्यक्रमामध्ये अजित पवार आणि सुप्रिया सुळे (Supriya Sule) हे एकत्रित दिसले. त्यावेळी माध्यमांशी संवाद साधताना अजितदादा आपल्या बहिणीला दिवाळीचं काय गिफ्ट देणार यावर सुप्रिया सुळे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे.
आमच्यात राजकीय मतभेद आहेत, पण ते मतभेद आम्ही कुटुंबामध्ये आणत नाही, आमची लढाई ही वैचारिक आहे, व्यक्तिगत नाही अशी प्रतिक्रिया खासदार सुप्रिया सुळे यांनी दिली. तर यंदाच्या दिवाळीत दादा आपल्या बहिणीला काय गिफ्ट देणार हे मला काय माहिती? दादालाच विचारा काय गिफ्ट देणार असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.
आमचे मनभेद नाहीत
राष्ट्रवादीच्या फुटीनंतर बारामतीतील एका कार्यक्रमामध्ये खासदार सुप्रिया सुळे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार हे एकाच स्टेजवर दिसले. त्या आधी प्रतापराव पवारांच्या घरी शरद पवार आणि अजित पवार यांची भेट झाली होती. आता दिवाळी पाडव्याच्या निमित्ताने सर्व पवार कुटुंबीय एकत्र येणार आहे. त्यामध्ये अजित पवार सहभागी होणार का असा प्रश्न विचारल्यानंतर सुप्रिया सुळे म्हणाल्या की, आमचे वैचारिक मतभेद आहेत, मनभेद नाहीत. जेव्हा आपले वय वाढते तेव्हा वैचारिक प्रगल्भता वाढली पाहिजे. आमची लढाई वैचारिक आहे व्यक्तिगत नाही. राजकीय मतभेद आहेत पण भाजपच्या अनेक नेत्यांशी आमचे संबंध आहेत. दादा कार्यक्रमात मास्क लाऊन बसले होते, त्यामुळे त्यांना भेटण्याची मुभा आहे का नाही हे डॉक्टर ठरवतील.
तुम्हा सगळ्यांचे प्रेम आणि आशीर्वाद हे शरद पवारांचे टॉनिक आहे असं खासदार सुप्रिया सुळे म्हणाल्या.
पवारांचा ओबीसी दाखला व्हायरल
शरद पवारांचा ओबीसी असल्याचा एक दाखला व्हायरल होत आहे. त्यावर बोलताना सुप्रिया सुळे म्हणाल्या की, जो दाखल दाखवला जतोय तो इंग्लिश मध्ये आहे. पवारसाहेब ज्यावेळी शाळेत होते तेव्हा शाळेत इंग्लिश असू शकते का? हे सगळे हास्यास्पद आहे. हा बालिशपणा सुरू आहे. खोटी सर्टिफिकेट आजकाल मार्केटमध्ये मोठी गोष्ट झाली आहे.
शरद पवारांना डॉक्टरांनी सांगितले आहे की घरी लोकांना भेटू शकता, पण प्रवास टाळावा. त्यामुळे आज, उद्या आणि परवा ते घरी सगळ्यांना भेटणार आहेत फक्त प्रवास करणार नाहीत अशी माहिती सुप्रिया सुळे यांनी दिली.
ही बातमी वाचा: