एक्स्प्लोर
उदयनराजेंच्या साताऱ्यात आज मराठा मूकमोर्चा
सातारा : मराठा मूकमोर्चाचं वादळ आज साताऱ्यात धडकणार आहे. साताऱ्यातील शाहू स्टेडियमपासून या मोर्चाला सुरुवात होईल. साताऱ्यातील राष्ट्रवादी काँग्रेसचे खासदार उदयनराजे भोसलेदेखील या मोर्चात सहभागी होणार आहेत.
कोपर्डीत प्रकरणातल्या दोषींना फाशी द्या, मराठ्यांना आरक्षण द्या, आणि अॅट्रॉसिटी कायद्यात सुधारणा करा, या मराठा समाजाच्या प्रमुख मागण्या आहेत.
उदयनराजे सुरुवातीपासूनच मराठा मोर्चाच्या समर्थनार्थ उभे राहिले आहेत. त्यामुळे उदयनराजेंच्या मतदारसंघात मोठ्या संख्येने मराठा समाज एकवटण्याची शक्यता आहे.
राज्यभरात लाखोच्या संख्येने निघणाऱ्या विराट मोर्चांची राज्यासह देशात चर्चा सुरु आहे. प्रत्येक मोर्चा संख्येचे नवनवीन उच्चांक प्रस्तापित करत आहे. अनेक गावातील गावकरी मोर्चात सहभागी होणार आहेत. त्यामुळे साताऱ्याचा मोर्चातही विक्रमी गर्दी होण्याची शक्यता आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
नाशिक
महाराष्ट्र
पर्सनल फायनान्स
Advertisement