एक्स्प्लोर

सलीम कुत्ता आणि सुधाकर बडगुजर यांच्या पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट, व्यंकटेश मोरेचा फोटो दाखवत राऊतांची चौकशीची मागणी

सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचे आयोजन भाजप पदाधिकाऱ्याने केले होते. व्यंकटेश मोरेच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण देण्यात आले होते, असे संजय राऊत म्हणाले.

नाशिक :  सलीम कुत्ताची (Salim Kutta)  सुधाकर बडगुजर (Sudhakar Badgujar) यांच्यासोबत पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट  भाजपचा पदाधिकारी व्यंकटेश मोरे हा 'त्या' पार्टीचा आयोजक असल्याचा ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दावा केला आहे. व्यंकटेश मोरेचे (Vyanktesh More)  देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis)  यांच्यासह नाशिकच्या भाजप पदाधिकाऱ्यांसोबतचे फोटो पत्रकार परिषदेत दाखवत संजय राऊतांनी  गौप्यस्फोट केला आहे. सलीम कुत्ताला पॅरोल कोणी दिला होता? तेव्हा गृहमंत्री कोण होते ? असाही प्रश्न राऊतांनी उपस्थित केला आहे.

संजय राऊत म्हणाले. आमची जी माहिती आहे, चंद्रशेखर बावनकुळे यांचा मकाऊतील व्हिडीओ सुधाकर बडगुजर यांच्या कुटुंबियांनी दिला. त्यामुळे त्यांच्यावर कारवाई झाली असल्याचं बोललं जातंय. कुठलातरी व्हीडिओ कुणीतरी दिला. म्हणून बडगुजर यांच्यावर कारवाई होणं चूक आहे. आपला कायदा अशा पद्धतीने काम करतो? मुळात तो व्हीडिओ बडगुजर यांच्या कुटुंबाने दिलाच नाही. बाळासाहेब ठाकरे यांची शपथ घेऊन सांगतो. बाळासाहेब ठाकरे हे माझं दैवत आहे. त्यांची मी कधी शपथ घेत नाही. पण आज त्यांची शपथ घेऊन सांगतो. त्या व्हिडीओशी सुधाकर बडगुजर यांचा काहीही संबंध नाही, असं संजय राऊत म्हणालेत.

कोण आहे व्यंकटेश मोरे ?

  •  व्यंकटेश मोरे हा भाजप कामगार मोर्चाचा नाशिक लोकसभा संयोजक आहे
  •  व्यंकटेश मोरेवर नाशिकच्या विविध पोलीस ठाण्यात खून, खुनाचा प्रयत्न यांसह अनेक गुन्हे दाखल आहेत 
  • खूनाच्या गुन्ह्यात व्यंकटेश मोरेला जन्मठेपेची शिक्षा सुनावण्यात आली असून सध्या तो जामीनावर बाहेर आहे 

बावनकुळे यांचा व्हिडीओ कुणी दिला?

भाजपच्या लोकांनी आपआपसात विचारलं पाहिजे बावनकुळे यांचा हा व्हीडिओ कुणी दिला ते… त्यांना चांगलंच माहिती आहे की बावनकुळे यांचा व्हीडिओ नेमका कुणी दिला. हा व्हिडीओ आमच्यापर्यंत कसा आला हे भाजप आणि संघ परिवाराला माहिती आहे. विशेषत: नागपूरच्या लोकांना माहिती आहे की, हा व्हिडीओ आम्हाला कुणी दिला ते… विनाकारण बडगुजर कुटुंबावर आरोप करू नका, असं संजय राऊत म्हणालेत.

गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा : संजय राऊत 

सलीम कुत्तासोबतच्या पार्टीचे आयोजन भाजप पदाधिकाऱ्याने केले होते. व्यंकटेश मोरेच्या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण देण्यात आले होते. त्या (कुत्ता) संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा, असेही संजय राऊत म्हणाले. 

हे ही वाचा :

आणखी वाचा
Sponsored Links by Taboola

महत्त्वाच्या बातम्या

साताऱ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, थेट उपमहापौरांच्या विरोधताच जोडो मारो आंदोलन
साताऱ्यानंतर आता छत्रपती संभाजीनगरमध्ये शिवसेना शिंदे गटातील वाद चव्हाट्यावर, थेट उपमहापौरांच्या विरोधताच जोडो मारो आंदोलन
आपसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्कमाफी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
आपसातील जमीन वाटपाच्या नोंदणीसाठी आता संपूर्ण शुल्कमाफी, मंत्री चंद्रशेखर बावनकुळेंचा शेतकऱ्यांना मोठा दिलासा
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
नालासोपाऱ्यात कारचा भीषण अपघात, अनियंत्रित कार कोसळली थेट विहीरीत, अग्निशमन दलाची टीम दाखल
नालासोपाऱ्यात कारचा भीषण अपघात, अनियंत्रित कार कोसळली थेट विहीरीत, अग्निशमन दलाची टीम दाखल

व्हिडीओ

Parth Pawar On Baramati Bypoll : बारामतीत मुद्दाम काही लोकांना उभा केला, पार्थ पवार यांचा मोठा आरोप
Ashok Kharat : भोंदू मांत्रिक अशोक खरातला पाच दिवसांची पोलीस कोठडी Special Report
Navneet Rana vs Vijay Wadettiwar | महिला आरक्षणावरुन राणा विरुद्ध काँग्रेस Special Report
Ralegaon Special Report : खरात,टीसीएस,परतवाड्यानंतर आता राळेगाव! यवतमाळमध्ये आदिवासी मुलींची तस्करी
Narishakti Bill Special Report :पंतप्रधानांविरुद्ध आचारसंहिता भंगाची तक्रार,मोदी सरकारवर जोरदार टीका

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 20 एप्रिल 2026 | सोमवार
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
ह्रदयद्रावक घटना... लातूरमध्ये दोन चिमुकल्यांसह आईची विहिरीत उडी; परिसरात खळबळ, पोलीस घटनास्थळी
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
'तोपर्यंत इराणशी चर्चा होऊच शकत नाही..' मध्यस्थी करणाऱ्या असीम मुनीरांनी फोनवरून ट्रम्पना थेट सुनावलं, म्हणाले, मी विचार करतो; अनेक आशियाई देश दबावात, तेल-वायू पुरवठा थांबला, कारखाने बंद पडले
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Video: मालकीण प्रिती झिंटाने 'जादू की झप्पी' देताच अर्शदीपचं 'आनंद माझ्या पोटात मावेना'! थेट मैदानात बल्ले बल्ले, मोहम्मद शमी हसत हसत तोंडाकडं पाहतच राहिला
Recruitment:करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती, ऑनलाईन अर्ज कधीपासून भरता येणार? पगार किती मिळणार?  
करन्सी नोट प्रेस, नाशिकमध्ये 534 जागांसाठी भरती,  पगार किती मिळणार? अर्ज कसा करायचा?
FDI : लवकरच पेन्शन क्षेत्रातील विदेशी गुंतवणूक वाढीला मंजुरी? केंद्र सरकार मोठा निर्णय घेणार, संसदेच्या पुढील अधिवेशनात विधेयक आणणार
लवकरच पेन्शन क्षेत्रात 100 टक्के विदेशी गुंतवणूक, मर्यादा हटवली जाणार,संसदेच्या पावसाळी अधिवेशनात विधेयक आणणार
Pachpadra Refinery: राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
राजस्थानमधील पाचपद्रा रिफायनरीला आग, पंतप्रधान मोदी उद्या करणार होते उद्घाटन; सभेच्या 800 मीटर अंतरावर भीषण दुर्घटना
Kolhapur Crime: कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
कोल्हापुरात भिंत अंगावर कोसळून एका प्राध्यापिकेसह शाळकरी विद्यार्थिनीचा जागीच मृत्यू; जुनं घर जेसीबीच्या साहाय्याने पाडत असताना काळाचा घाला
Embed widget