एक्स्प्लोर
Advertisement
संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचं निधन
मुंबई : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ प्रचारक सुरेशराव केतकर यांचं आज सकाळी 8 वाजता निधन झालं. दीर्घ आजाराने त्यांनी 84 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. लातूरमधील रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरु होते, तिथेच त्यांची प्राणज्योत मालवली.
दरम्यान, सुरेश केतकरांच्या जाण्याने अतिव दु:ख झालं आहे. आमचा रोल मॉडेल हरपला, अशी प्रतिक्रिया सरसंघचालक मोहन भागवत यांनी एबीपी माझाकडे व्यक्त केली. सुरेशराव केतकर हे स्वत:साठी अत्यंत कठोर, इतरांसाठी मृदू होते. त्यांनी अनेकांना घडवलं. त्यामुळे त्यांच्या निधनाने एक मार्गदर्शक गमावला, असं भागवत म्हणाले.
केतकर यांच्या पार्थिवावर आज दुपारी १.०० वाजता लातूर येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यापूर्वी पार्थिव अंत्यदर्शनासाठी विवेकानंद रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
सुरेश केतकर हे उत्तम ड्रम वादक होते. त्यांनी काही हजार लोकांना ड्रम शिकवला आहे. ते पदवीधर झाले तेव्हा त्यांनी त्यांच्या आईलाही आग्रहपूर्वक 10 वी ला बसण्याचा आग्रह केला होता. त्यानुसार सुरेश केतकर हे बीएससी झाले, त्याचवेळी त्यांची आई दहावी पास झाली.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
भारत
निवडणूक
निवडणूक
निवडणूक
Advertisement