एक्स्प्लोर
Advertisement
विजयादशमीला स्वयंसेवक फुल पँटमध्ये दिसणार
नागपूर : हाफ पँटमुळे अनेकदा चेष्टेला सामोरे जाणाऱ्या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचा बदललेला गणवेश विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. येत्या विजयादशमीपासून आरएसएसचे स्वयंसेवक हाफ नव्हे तर फुल पँटमध्ये दिसणार आहेत. त्यामुळे गेल्या 91 वर्षांची आरएसएसची ओळख बनलेली हाफ पँट आता हद्दपार होणार आहे.
पांढरा सदरा, काळी टोपी, कमरेला पट्टा, पायात बूट, हातात काठी आणि तपकिरी रंगाची फुल पँट असा आरएसएसचा नवा गणवेश असेल.नागपुरातील रेशीमबाग इथल्या स्मृती मंदिरात संघाचा नवा गणवेश विक्रीसाठी उपलब्ध झाला आहे. संघाच्या भांडार विभागात नवा गणवेश मिळेल.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे तरुण वर्ग आकर्षित होत आहे. यामुळे बदलत्या काळानुसार आता स्वयंसेवकांच्या गणवेशातही बदल व्हावा, असा मतप्रवाह संघात निर्माण झाला. त्यानंतर गेल्या वर्षीच्या मार्च महिन्यात राजस्थानच्या नागौरमध्ये झालेल्या संघाच्या सभेत गणवेश बदलण्याचा निर्णय घेण्यात आला होता.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
सोलापूर
पुणे
निवडणूक
निवडणूक
Advertisement