एक्स्प्लोर

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना दिलासा, तब्बल 346 दिवसांनंतर जामीन मंजूर

रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. त्यांना तब्बल 346 दिवसानंतर नायालयाने जामीन मंजूर मिळाला आहे. शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याचा आरोप त्यांच्यावर आहे.

परभणी : शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर कोट्यवधींचे कर्ज घेतल्याप्रकरणी न्यायालयीन कोठडीत असलेले रासप आमदार रत्नाकर गुट्टे यांना सर्वोच न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. तब्बल 346 दिवस कारागृहात राहिल्यानंतर त्यांना या प्रकरणात जामीन मिळाला आहे. गुट्टे यांनी कारागृहातूनच 2019 मध्ये गंगाखेड विधानसभेची निवडणूक लढवली आणि ते जिंकले हे विशेष.

26  मार्च 2019 रोजी रत्नाकर गुट्टे यांना औरंगाबाद येथील सीआयडी पथकाने अटक करुन गंगाखेडच्या कनिष्ठ न्यायालयात हजर केले होते. यानंतर हे प्रकरण बरीच दिवस औरंगाबाद उच्च न्यायालयात चालले. तिथे त्यांना जामीन मिळाला नाही. शेवटी उच्च न्यायालयातून त्यांनी सर्वोच न्यायालयात दाद मागितली आणि तिथेही अनेक तारखा झाल्यानंतर, आज त्यांना तब्बल 346 दिवसानंतर नायालयाने जामीन मंजूर केला आहे. काय आहे प्रकरण? 2017 मध्ये परभणीच्या गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याने 29 हजार शेतकऱ्यांच्या नावाने परस्पर सहा बँकाकडून तब्बल 328 कोटींचे कर्ज उचललं होतं. गंगाखेड शुगर्स अँड एनर्जी लिमिटेड या कारखान्याच्या संचालक मंडळाने आणि बँकांच्या अधिकाऱ्यांनी संगनमत करुन, ज्या शेतकऱ्यांनी कारखान्याचे शेअर्स घेतले, त्याचबरोबर ऊस पुरवला, त्या परभणी, बीड, उस्मानाबाद, लातूर, जालना या चार जिल्ह्यांबरोबरच इतर राज्यातीलही असंख्य शेतकऱ्यांची बनावट कागदपत्रे तयार केली. यानंतर पाच राष्ट्रीयकृत बँका ज्यात आंध्रा बँक, युको बँक, युनायटेड बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ इंडिया, सिंडिकेट बँक तर मुंबईची रत्नाकर बँककडून तब्बल 328 कोटीची रक्कम परस्पर उचलली. याबाबत बँकांनी शेतकऱ्यांना नोटीस पाठवली, तेव्हा हे प्रकरण उजेडात आले होते. रत्नाकर गुट्टे याच्यावर 5 जुलै 2017 रोजी भादंवि कलम 406, 409, 417, 420 आणि 467, 468, 471, 120-ब अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता. त्या प्रकरणात दोन वर्षानंतर कारवाईला सुरुवात झाली. 28 फेब्रुवारी 2019 रोजी गंगाखेड शुगर्स कारखान्याचे मुख्य कृषी अधिकारी नंदकुमार शर्मा, ऊस पुरवठा अधिकारी तुळशीदास अंभोरे, ऊस विकास अधिकारी बच्चूसिंह पडवळ यांना अटक करण्यात आली होती. यानंतर औरंगाबाद सीआयडीच्या पोलीस अधीक्षक लता फड, डीवायएसपी पठाण यांचे पथक गंगाखेडमध्ये दाखल झाले. त्यांनी रत्नाकर गुट्टे यांना अटक करुन गंगाखेड कनिष्ठ न्यायालयात हजर करुन या प्रकरणाचे दोषरोप पत्रही दाखल केले. यावेळी न्यायालयाने त्यांची रवानगी न्यायालयीन कोठडीत केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget