एक्स्प्लोर

सुप्रिया सुळे,चित्रा वाघ यांच्या वादात रोहिणी खडसेंची एन्ट्री; पार भाजपचा इतिहासचं वाचून दाखवला

सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर रोहिणी खडसे यांनी निशाणा साधला आहे. सोबतच भाजपमधील काही नेत्यांवर कसा अन्याय केला जातो याचा पाढाच वाचून दाखवला आहे. 

मुंबई: राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) आणि भाजपच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष चित्रा वाघ (Chitra Wagh) यांच्यात ट्वीटर वॉर पाहायला मिळत असतानाच, त्यांच्या वादात आता राष्ट्रवादीच्या महिला मोर्च्याच्या प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसेंची (Rohini Khadse) एन्ट्री पाहायला मिळत आहे. सुप्रिया सुळे यांच्यावर टीका करणाऱ्या चित्रा वाघ यांच्यावर खडसे यांनी निशाणा साधला आहे. सोबतच भाजपमधील काही नेत्यांवर कसा अन्याय केला जातो याचा पाढाच वाचून दाखवला आहे. 

रोहिणी खडसे नेमकं काय म्हणाल्या? 

"अहो चित्राताई, भारतीय जनता पक्षात महिलांना मान सन्मान दिला जातो हे तुम्हाला कुणी सांगीतलं बरं? आम्ही अनेक वर्षे तिथे होतो, आम्हाला महित आहे काय आहे. बरं ठिक, तुमचे म्हणणे बरोबर आहे, असे म्हटले तर मग, आदरणीय पंकजाताईवर अन्याय कशासाठी सुरु आहे हो?,  जरा विचारा ना तुमच्या नेत्यांना. केवळ त्याच नाही तर ज्यांनी पक्ष वाढविला, तळागाळात पोहचविला त्या प्रमोदजी महाजन यांच्या कन्या खासदार पुनमताई महाजन सध्या कुठेच दिसत नाहीत. पुण्यातल्या मेधाताई कुळकर्णींचे काय? त्यांची जागा चंद्रकांतदादांनी हिसकावली, नंतर त्यांच्या हातावर अक्षदा देण्यात आल्या हा त्यांचेवर अन्याय नाही का? बरं राज्यापुरतेच हे मार्यादित नाही बरं का, चित्रताई... अगदी दिल्लीत देखील दिवंगत नेत्या सुषमा स्वराज यांचेवरही अन्यायच झाला आहे. तुम्हाला माहितीच घ्यायची ना? तर वसंधुराराजेंना विचारा अन्याय काय असतो ते.. अगदीच झालं तर आदरणीय सुमित्राताई महाजन यांनाही विचारा की, पक्षात अन्याय कसा असतो ते.... राहीले राष्ट्रवादी काँग्रेसचे, तर इथे जर महिलांवर अन्याय होत असता तर ‘तुम्हाला राज्याचे प्रमुख पद तरी दिले असते का हो?’ उगाच टिका करायची म्हणून काहीही करु नका ताई. अशानं हसे होते बरं का....

काय म्हणाल्या होत्या चित्रा वाघ? 

राज्याच्या मोठ्ठ्या ताई…सुप्रियाताईंना 100 कोटी वसुली करून देणारा गृहमंत्रीच आवडत असेल तर त्याला महाराष्ट्र तरी काय करणार? गुन्हेगारांच्या मुसक्या आवळणारा गृहमंत्री तुम्हाला आवडणार नाहीच. महिलांच्या बेपत्ता प्रकरणात संपूर्ण देशातील आणि अगदी महाविकास आघाडी काळातील परिस्थिती सभागृहात सांगून तुमचे समाधान होणार नाही. कारण ससून प्रकरणात 9 पोलिस निलंबित झाले, पण तुम्हाला ते आवडले नसेल. हेरंब कुलकर्णी हल्लाप्रकरणी आरोपींना बेड्या ठोकल्या, पण तेही तुम्हाला आवडले नसेल कारण... कारण, तुम्हाला फक्त 100 कोटीत रस आहे. मग ते एकरी वांग्यातून असो की वसुली करून देणारा गृहमंत्री..  तुम्हाला हवे काय? ...आरोपींना लोणावळ्यात सरकारी इतमामात पळून जायला मदत करणारा गृहमंत्री हवाय? की उद्योगपतींच्या घरासमोर स्फोटके ठेवायला मदत करणारा, अशा पोलिसांना सेवेत घेणारा गृहमंत्री? तुमची चॉईसच वेगळी आहे, त्याला महाराष्ट्र करणार तरी काय महाराष्ट्राच्या मोठ्ठ्या ताई?, असे चित्रा वाघ म्हणाल्या होत्या. 

इतर महत्वाच्या बातम्या: 

Supriya Sule vs Chitra Wagh : मोठ्ठ्या ताई, तुमची चॉईसच वेगळी, महाराष्ट्र करणार तरी काय? चित्रा वाघ यांची सुप्रिया सुळेंवर बोचरी टीका

महत्त्वाच्या बातम्या

Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 
देशात सर्वाधिक साखर उत्पादन करणारी राज्य कोणती? महाराष्ट्राचा कितवा नंबर? जाणून घ्या संपूर्ण यादी 

व्हिडीओ

Chhatrapati Sambhajinagar News: मुलगा आणि वडिलांमध्ये नेमका वाद काय होता, तपासातून कारण काय समोर आलं?; DCP नवले यांनी A टू Z सांगितलं!
Rahul Gandhi Pune : राहुल गांधींच्या कार्यक्रमासाठी जोरदार तयारी, बाराशे पोलिस तैनात
Mahabaleshwar Tourist News: धुक्यात हरवलं महाबळेश्वर; सह्याद्रीच्या हिरवाईने पर्यटकांना घातली भुरळ
Abhijeet Dipke On School : शाळेत धडक, नियम किती कडक? | Special Report ABP Majha
Prithviraj Chavan On NCP : पृथ्वीराज चव्हाणांचा दावा, तापली राजकीय हवा | Special Report ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Bhuleshwarcha Raja : मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत अपघात,आगमन मिरवणुकीत घडला प्रकार, तीन जण जखमी
मुंबईतील भुलेश्वरच्या राजाच्या आगमन मिरवणुकीत दुर्घटना, अपघातात तीन जण जखमी
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
बाजारात साखर महागली, भाव कडाडले; कृषीमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले, शेतकऱ्यांना फायदा होईल
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Video: पुण्यात छात्रों की गूंज, नेहा म्हणाली, मला सगळे शिव्या देतात; राहुल गांधींनी सांगितला स्वत:चा अनुभव
Rahul Gandhi: ही गोष्ट निशाची नाही, सर्व आदिवासी विद्यार्थ्यांची, संपूर्ण देशाची महाराष्ट्राची, राहुल गांधींसमोर विद्यार्थिनीनं अडचणींचा पाढा वाचला 
आदिवासी विकास विभागाचे मंत्री म्हणतात आय एम सॉरी, निशानं राहुल गांधींसमोर धडाधड समस्या मांडल्या
ABP Majha Top Headlines : ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 22 ऑगस्ट 2026 | शनिवार
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
मुंबईतून संभाजीनगरला आलो, पण ती डिफेंडर माझी नाही; बंडू जाधव म्हणाले, माझं कुणाला बघवणा झालंय
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
भाजपवाला दिसला की कॉलर पकडायची अन्...; बारामतीतून संजय राऊतांचा हल्लाबोल, रामरक्षा आंदोलनात गोंधळ
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
पाकिस्तानाने पाकव्याप्त काश्मीरात रिपोर्टिंग करणाऱ्या पत्रकाराला थेट दहशतवादी यादीत टाकलं! कोणत्याही खटल्याशिवाय कारवाई, बँक खाती सील अन् प्रवासावर सुद्धा बंदी
Embed widget