एक्स्प्लोर

Ravikant Tupkar : रविकांत तुपकर यांचं अन्नत्याग आंदोलन स्थगित; पालकमंत्री शिंगणे, विरोधी पक्षनेते फडणवीसांच्या आश्वासनानंतर घोषणा

Ravikant Tupkar Hunger Strike : बुलढाण्यात रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अखेर आज हे आंदोलन स्थगित झालं आहे.

Ravikant Tupkar : स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांच्या अन्नत्याग आंदोलन अखेर स्थगित करण्यात आलं आहे. राज्य सरकारकडून उपमुख्यमंत्री अजित पवार आणि पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे यांनी तर केंद्र सरकारकडून देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली. दरम्यान, सोयाबीन आणि कापसाला भाव मिळावा यासाठी रविकांत तुपकर यांचं गेल्या चार दिवसांपासून अन्नत्याग आंदोलन सुरु होतं. तुपकरांची तब्येत ढासळत असल्यानं कार्यकर्त्यांची चिंता वाढू लागली होती. 

आंदोलनाला हिंसक वळण

रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्याग आंदोलनाला हिंसक वळण लागलं होतं. अन्नत्याग आंदोलनामुळे काल तुपकर यांची प्रकृती खालावली होती. त्यामुळे आक्रमक झालेल्या स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको करत तुपकरांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. प्रशासनाकडून कोणत्याही प्रतिसाद न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक झाले होते. एका संतप्त कार्यकर्त्याने अंगावर पेट्रोल ओतून घेत आत्मदहनाचा प्रयत्न केला होता. यानंतर हे आंदोलन आणखी चिघळलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी मलकापूर-औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्ता रोको करत जोरदार घोषणाबाजी केली होती. पोलिसांच्या गाडीच्या काचाही यावेळी फोडण्यात आल्या. यानंतर तुपकरांच्या घराबाहेर पोलीस बंदोबस्त वाढवला होता. या ठिकाणी येणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. सध्या या ठिकाणी तणावपूर्ण शांतता आहे. 

रविकांत तुपकरांच्या अन्नत्याग आंदोलनाला रात्री पुन्हा हिंसक वळण लागलं. स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांनी बुलडाणा तहसीलदार यांची गाडी पेटवली. तुपकरांची प्रकृती खालावल्याने शेतकरी आणि कार्यकर्ते संतापल्याचं पाहायला मिळालं. 

17 नोव्हेंबर पासून सुरु असलेल्या अन्नत्याग आंदोलनाला काल (शुक्रवारी) संपूर्ण विदर्भातील शेतकऱ्यांनी उस्फुर्त प्रतिसाद दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी सुरु केलेल्या अन्नत्यागाचा आज चौथा दिवस असून ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात रास्तारोको करण्यात आला आहे. दरम्यान प्रशासनाकडून कोणताही प्रतिसाद नसल्यानं कार्यकर्ते आणि शेतकरी आक्रमक झाले होते. आंदोलनस्थळी तुपकरांच्या निवासस्थानाबाहेर एका संतप्त कार्यकर्त्यानं आपल्या अंगावर पेट्रोल घेऊन आत्मदहनाचा प्रयत्न केला आणि एकच गदारोळ उडाला. पोलिसांनी कार्यकर्त्यांना अडवण्याचा प्रयत्न केला. मात्र परिस्थिती हाताबाहेर गेली आणि मलकापूर औरंगाबाद राज्य महामार्गावर रास्तारोको करत जोरदार घोषणाबाजी झाली. दरम्यान पोलिसांच्या गाडीच्या काचा देखील फोडण्यात आल्या. तारांबळ उडालेल्या प्रशासनानं सर्व परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी अतोनात प्रयत्न केले, शेवटी काही कालावधीनंतर प्रकरण निवळलं. परंतु सद्यस्थितीत तुपकरांच्या घराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला असून येणाऱ्या जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांना पाठिंबा देण्यासाठी मोठ्या संख्येने तुपकरांच्या घरासमोर जमत आहे. सध्या तुपकरांच्या घरासमोर तणावपूर्ण शांतता आहे. दरम्यान, रात्री उशिरा बुलढाणा तहसीलदार यांची गाडी जाळण्याचा प्रयत्न काही आंदोलकांनी केल्यामुळे आज अजूनही पोलीस बंदोबस्तात वाढ करण्यात आली होती. दरम्यान, आता आंदोलन स्थगित करण्यात आलं असून पालकमंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे आणि विरोधी पक्षनेते  देवेंद्र फडणवीस यांच्या आश्वासनानंतर रविकांत तुपकर यांनी स्वतः आंदोलन स्थगित करत असल्याची घोषणा केली.

महत्त्वाच्या इतर बातम्या : 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Majha Gaon Majha Jilha : राज्यभरातील गावा-खेड्यातील बातम्या : माझं गाव माझा जिल्हा : 29  मार्च 2024Pankaja Munde : नेहमी ऐनवेळी कुणाला तरी उमेदवारी देण्याची विरोधकांवर वेळ येते, पंकजा मुंडेंचा निशाणाDinesh bub : दिनेश बुब यांचा प्रहारमध्ये प्रवेश, शिवसेनेतून बाहेर पण शिवसेना रक्तात : दिनेश बुबVijay Shivtare Full PC :  निवडणूक लढण्यासंदर्भात अधिकृत भूमिका उद्याच घोषित करणार : शिवतारे

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
नितेश राणेंची रक्त तपासणी केली पाहिजे, बच्चू कडूंचा हल्लाबोल
Amravati Loksabha Election : ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
ठरलं तर!  नवनीत राणांच्या विरोधात प्रहारच्या 'या' बड्या नेत्याने दंड थोपटले; अमरावती मतदारसंघात नवा ट्विस्ट 
Hardik Pandya: हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
हार्दिक पांड्याला यापुढे ट्रोल कराल, तर खबरदार...; वानखेडे मैदानावरील लढतीआधी मोठी माहिती समोर
Mrunal Dusanis : मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
मृणाल दुसानिसच्या लेकीला पाहिलत का? क्युटनेसमध्ये बॉलिवूडच्या स्टारकिड्सला देतेय टक्कर
Sharad Pawar Collar Video :उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
उदयनराजेंच्या बालेकिल्ल्यात शरद पवारांनी कॉलर उडवली
Manoj Jarange Patil : 'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
'संघर्षयोद्धा'चित्रपटात अजय गोगावलेच्या आवाजात हृदयस्पर्शी गाणं
Bachchu Kadu on Amravati : आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंनी शड्डू ठोकला
आम्ही 'सागरा'तल्या लाटा, ब्रह्मदेव आला तरी थांबत नाही, लढणार आणि जिंकणार! बच्चू कडूंचा निर्धार
Ram Satpute : यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
यांनीच हिंदूंना दहशतवादी म्हटलं, आता मंदिरांना भेटी देतायत, 'बात निकलेगी तो दूर तक जायेगी' म्हणत राम सातपुतेंची प्रणिती शिंदेंवर टीका
Embed widget