ज्यांच्या सभेला परवानगी आहे ते काय कोविड न होणारं जाकीट घालून येतात का? : रविकांत तुपकर
Ravikant tupkar : जमावबंदीचे आदेश लागू असतानाही शरद पवार यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यावर रविकांत तुपकर यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत केली
Ravikant tupkar : नागपुरात 144 धारा (जमावबंदीचे आदेश) लागू असतानाही राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांच्या सभेला परवानगी देण्यात आली आहे. त्यावर स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर (Ravikant tupkar) यांनी तीव्र शब्दात नाराजी व्यक्त करत केली आहे. मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, आणि आम्हाला नाही. अमरावती कारण असो किंवा कोविड - ते काय कोविड न होणारे जॅकेट घालून येतात का? असा सवाल तुपकर यांनी उपस्थित केलाय. पोलिसांची परवानगी नसताना रविकांत तुपकर यांनी नागपुरात संविधान चौकात आंदोलन सुरु केलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकर यांनी राज्य सरकारच्या धोरणावर टीका केली आहे. मोठ्या नेत्यांच्या सभेला परवानगी मिळते, अन् आम्हाला मिळत नाही, असा खेद त्यांनी व्यक्त केला आहे. नागपूरात 144 धारा लागू असल्यामुळे तुपकर यांच्या सभेला परवानगी देण्यात आलेली नाही. तरीही तुपकर यांनी आंदोलन पुकारलं आहे. नागपुरातील संविधान चौकात रविकांत तुपकार यांनी आंदोलन पुकारलं आहे. परवानगी नसताना आंदोलन करणाऱ्या तुपकारावर प्रशासन काय कारवाई करतात? हे याकडे लक्ष लागलं आहे.
स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते रविकांत तुपकरी यांनी आजपासून 'बेमुदत अन्नत्याग आंदोलन' सुरु केलं आहे. कापूस आणि सोयाबीन उत्पादक शेतकऱ्यांना योग्य भाव मिळावा यासाठी तुपकर यांनी अन्नत्याग आंदोलन पुकारलं आहे. नागपुरातील संविधान चौकात तुपकर यांनी आंदोलनाला सुरुवात केली आहे. नागपुरात जमावबंदीचे आदेश असल्यानं तुपकर यांनी आंदोलन करू नये यासाठी पोलिसांनी तुपकरांना पत्र पाठवले होते. मात्र, तरीही त्यांनी आंदोलन पुकारलं आहे. संविधान चौकात चोख पोलीस बंदोबस्त तैणात करण्यात आला आहे. परवानगी नसतानाही आंदोलन पुकारणाऱ्या तुपकारांवर पोलीस आता काय करतात ह्याकडे लक्ष लागलं आहे. नागपुरात कलम 144 लागू असल्याने कारवाई होऊ शकते, असं बोललं जात आहे.
शरद पवार आजपासून विदर्भ दौऱ्यावर -
राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आजपासून विदर्भाच्या दौऱ्यावर आहेत. नागपूरमधून पवारांच्या विदर्भ दौऱ्याला सुरुवात होत आहे. नागपुरात शरद पवारांच्या स्वागताची जय्यत तयारी करण्यात आली आहे. आज सकाळी शरद पवार चार्टर्ड विमानाने नागपूरला येत आहेत. बुधवारी दुपारी तीन वाजता शहरातील व्यावसायिकांसोबत चर्चा करतील. त्यानंतर साडेचार वाजता पत्रकारांना संबोधित करतील. साडेपाच वाजता वर्धमान नगर येथील सात वचन लॉन येथे राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा मेळावा आयोजित करण्यात आला आहे.