एक्स्प्लोर

मोठी बातमी! निवडणूक आयोगाने संवैधानिक शिस्त पाळली नाही, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन हायकोर्ट संतप्त

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही निवडणूक आयोगाला चांगलीच तंबी दिली. तसेच, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली.     

मुंबई: राज्यातील नगरपालिका आणि नगरपंचायत निवडणुकांच्या (Election) निकालाची तारीख अचानक पुढे ढकलण्याचे निर्देश मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने दिले. तत्पूर्वी, निवडणूक आयोगाने (Election commission) 72 तासांच्या आधी 24 नगराध्यक्ष आणि 150 पेक्षा जास्त नगरसेवक प्रभागातील निवडणुका पुढे ढकलल्या. त्यामुळे, ऐनवेळी उमेदवारांची आणि कार्यकर्त्यांची गोंधळसदृश्य परिस्थिती निर्माण झाली होती. त्यामुळेच, नागपूर खंडपीठीने एकाच निवडणुकीच्या निकालाच्या दोन तारखा मान्य नसल्याचे निदर्शनास आणून देत निकालाची तारीख 21 डिसेंबर करण्यात आली. त्यामुळे, निवडणूक आयोगाचा भोंगळ कारभार समोर आला असून आता उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठानेही (Highcourt) निवडणूक आयोगाला चांगलीच तंबी दिली. तसेच, निवडणुका पुढे ढकलल्यावरुन तीव्र नाराजी व्यक्त केली.     

उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाने राज्य निवडणूक आयोगाला चांगलच झापलं आहे. नगरपालिका तसेच नगरपंचायत निवडणुका अखेरच्या क्षणी लांबणीवर टाकण्याच्या निवडणूक आयोगाच्या निर्णयावर तीव्र नाराजी व्यक्त करत हायकोर्टाने खडे बोल सुनावले. मुंबई हायकोर्टाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या न्या.विभा कंकणवाडी आणि न्या.हितेन वेणेगावकर यांच्या खंडपीठापुढे संबंधित याचिकांवर आज सुनावणी झाली. ऐनवेळी निवडणूक लांबणीवर टाकणे टाळता येण्यासारखे होते, आयोगाकडून निवडणुका पुढे ढकलण्याचा झालेला निर्णय योग्य नव्हता, अशा शब्दात उच्च न्यायालयाने निवडणूक आयोगाला तंबी दिली. अशी कोणतीही आपातकालीन स्थिती नव्हती की, ज्यामुळे निवडणुका लांबणीवर टाकण्यात आल्या. निवडणूक आयोगाने कॅलेंडर पाळायला हवे होते. निवडणूक आयोगाने 72 तास पूर्वी असा प्रकार करुन प्रशासकीय दृरदृष्टीच्या अभावाचे प्रदर्शन केले आहे आणि असे करताना संवैधानिक शिस्त पाळली नाही, असे गंभीर निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. 

भविष्यात असे प्रकार नको, गाईडलाईन्स तयार करा

लोकशाहीत निवडणुकीचे वेळापत्रकाचे पावित्र्य पाळणे हे मुलभूत कर्तव्य आहे. निवडणुका लांबणीवर टाकायच्या असतील त्याला भक्कम आधार असणे गरजेचे आहे आणि तसा निर्णय घ्यायचाच असेल तर तो आधी व्हायला हवा, असेही निरीक्षण हायकोर्टाने नोंदवले. तसेच, भविष्यात असे प्रकार होऊ नयेत, म्हणून 10 आठवड्यात यासंबंधीच्या गाईडलाईन्स तयार करण्याचे आदेश देखील हायकोर्टाने आयोगाला दिले आहेत. त्यासह, भविष्यात असे प्रकार होऊ नये, अशीही तंबी दिली. त्यामुळे, निवडणूक आयोगाच्या वादग्रस्त निर्णयाने संतप्त झालेल्या राजकीय नेत्यांसह, जनतेसह आता हायकोर्टानेही तीव्र शब्दात निवडणुका आणि निकाल पुढे ढकलण्यासंदर्भाने नाराजी व्यक्त केली.

हेही वाचा

शिवेंद्रराजेंच्या लेकीचा शाही लग्नसोहळा, दिग्गजांची उपस्थिती; देवेंद्र फडणवीसांकडे CM फंडात दिला निधी

Covers Business, Environment and climate change, Health, Science & tech and Policies! Believes in strength of quill!
Read
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BJP mayor : पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
Share Market : अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा
अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?

व्हिडीओ

KDMC Mayor : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sanjay Raut Shivsena : सत्तास्थापनेसाठी श्रीकांत शिंदेंच्या मनसे नेत्यांसोबत बैठका, राऊत काय म्हणाले?
KDMC Thackeray vs Thackeray : कल्याण डोंबिवलीत मनसेने घेतलेल्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज?
Sarita Mhaske Mumbai : काल शिंदे गटात, आज पुन्हा सरिता म्हस्के ठाकरे गटात, नेमकं काय घडलं?
Ravindra Chavan on KDMC : KDMC मध्ये सत्तेसाठी मनसे शिंदेंसोबत; रविंद्र चव्हाण म्हणाले...

फोटो गॅलरी

ABP Premium

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Shivsena : मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
मोठी बातमी : राजूल पटेल ते प्रतिमा खोपडे, तुमच्या बंडखोरांमुळे आमचे 11 उमेदवार पडले, शिंदेसेनेने भाजपला खडसावलं, आकडेवारीच दाखवली
BJP mayor : पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
पुण्याचा कोण होणार कारभारी? भाजपकडून महापौरपदासाठी प्रबळ दावेदारांची नावं चर्चेत, कोणाला मिळू शकतं पद
Share Market : अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी, गुंतवणूकदारांना दिलासा
अखेर शेअर बाजारातील घसरणीला ब्रेक, डोनाल्ड ट्रम्प यांच्या एका भूमिकेनं सेन्सेक्स- निफ्टीत तेजी
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
कल्याण डोंबिवलीत 'स्थानिक' पातळीवर दिलेला पाठिंबा काढून घेण्यास राज ठाकरेंना सांगणार का? उद्धव ठाकरेंना हा प्रकार माहीत होता का, ते बोलणार का? संजय राऊत काय म्हणाले?
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
कोल्हापुरात झेडपी अन् पंचायत समितीला करवीर तालुक्यात सर्वाधिक चुरस; राधानगरी दुसऱ्या क्रमांकावर
BMC Mayor BJP-Shivsena Shinde Group: मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
मुंबई महानगरपालिकेत महापौरपद कोणाला, भाजप-शिंदेंच्या शिवसेनेला काय काय मिळणार?; पाहा A टू Z माहिती
Vasant More: वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
वसंत मोरेंचा निवडणूक अधिकाऱ्यांवर आक्षेप; आकडेवारी अन् मतमोजणी झालेल्या आकडेवारी फरक मांडला समोर, जितक्या मतांनी हारले तितकीच मतं झाली कमी
Uddhav Thackeray Kalyan-Dombivli MNS-Shivsena: मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
मनसेच्या निर्णयामुळे उद्धव ठाकरे नाराज; नगरसेवकांसमोर मनातलं सगळं बोलले, मातोश्रीवर नेमकं काय घडलं?
Embed widget