एक्स्प्लोर
प्रकाश आंबेडकरांनी वंचितांना सत्तेपासून दूर ठेवलं : रामदास आठवले
आगामी विधानसभेच्या छोट्या मित्र पक्षांना 20 जागा हव्या आहेत. त्यापैकी आठवले गटाला 12 जागा मिळाव्यात आणि सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी आठवले यांनी आज कोल्हापुरात केलीय.
कोल्हापूर : केंद्रीय मंत्रीपदाची शपथ घेतल्यानंतर पहिल्यांदाच रामदास आठवले यांनी कोल्हापुरात पत्रकार परिषद घेतली. यावेळी बोलताना आठवलेंनी प्रकाश आंबेडकरांवर वंचितांना सत्तेपासून दूर ठेवल्याचा आरोप केल आहे. तसेच वंचितांना सत्तेत आणायचे असल्यास त्यांनी एनडीएबरोबर यावं असाही सल्ला यावेळी आठवले यांनी प्रकाश आंबेडकरांना दिला आहे.
Majha Katta | ..तर विधानसभा निवडणुकीवर बहिष्कार टाकणार : प्रकाश आंबेडकर | माझा कट्टा | ABP Majha
तसेच या पत्रकार परिषद बोलताना त्यांनी राहुल गांधी, शरद पवार आणि प्रकाश आंबेडकर यांच्यावर आपल्या खास शैलीत टिका केली आहे. राहुल गांधी यांनी उलट सुलट बोलून मतं घालवली आहेत. त्यामुळं त्यांना आता तोंड दाखवायला देखील जागा राहिलेली नाही असं वक्तव्य आठवले यांनी केलं आहे. यावेळी बोलताना राष्ट्रवादीचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी देखील आता एनडीएसोबत येण्याचं आव्हान केलं आहे. काँग्रेस देशात लवकर सत्तेत येईल असं वाटत नाही. त्यामुळे देशाच्या हितासाठी पवारांनी मोदींना साथ द्यावी असंही आठवले म्हणाले.
Ramdas Athawale | उद्धव ठाकरे दहावेळा अयोध्येला गेले तरी राम मंदिर बनू शकत नाही : रामदास आठवले | ABP Majha
राम मंदिर अयोध्येतच व्हावे असं माझं मत आहे, मात्र त्यासाठी मुस्लीमांवर दबाव टाकता कामा नये. शिवाय ते मंदिर अधिकृत असावे असं मतं रामदास आठवले यांनी राम मंदिराच्या मुद्द्यावर आठवले मांडले आहे. तसेच आगामी विधानसभेच्या छोट्या मित्र पक्षांना 20 जागा हव्या आहेत. त्यापैकी आठवले गटाला 12 जागा मिळाव्यात आणि सत्तेत वाटा मिळावा अशी मागणी आठवले यांनी आज कोल्हापुरात केलीय. यावेळी ईव्हीएमवर संशय व्यक्त करण्यांचा आठवलेंनी समाचार घेतला.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement