एक्स्प्लोर

शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, राज ठाकरेंची सरकारला विनंती, मनसैनिकांनाही प्राणी-पक्ष्यांची काळजी घेण्याचं आवाहन

उन्हाचा (Maharashtra Heat)  हा तडाखा इतका जबरदस्त आहे की, नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहेत. शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, अशी विनंती राज ठाकरेंनी सरकारला केली आहे. 

मुंबई :  राज्यात  गेल्या काही दिवसांपासून तापमानात कमालीची वाढ (Heat Wave) होताना दिसून येत आहे. जागतिक वातावरणातल्या हवामान बदलामुळं यंदाचा उन्हाळा दरवर्षीपेक्षा वेगळा असल्याचं जाणवत आहे. त्यामुळं मुंबई आणि आसपासच्या महानगरांमधल्या नागरिकांना उन्हाचे चटके सहन करावे लागत आहेत. उन्हाचा (Maharashtra Heat)  हा तडाखा इतका जबरदस्त आहे की, नागरिकांना आरोग्याच्या विविध समस्यांना सामोरे जावं लागत आहेत. या पार्श्वभूमी मनसे (MNS) अध्यक्ष राज ठाकरेंनी (Raj Thackeray)  मनसैनिकांनाही प्राणी-पक्ष्यांची काळजी घेण्याचं आवाहन केले आहे. तसेच शाळांना लवकर सुट्टी जाहीर करा, अशी विनंती देखील सरकारला केली आहे. 

राज ठाकरे म्हणाले,  गेले काही दिवस मुंबई, ठाणे जिल्हा, पालघर जिल्हा, कोकण ह्या भागात दिवसाचं सरासरी तापमान हे जवळपास 40 अंशांपर्यंत गेलं आहे. अर्थात उर्वरित महाराष्ट्रात पण काही वेगळी स्थिती नाहीये. उष्णतेची लाट आली आहे असं जाहीर झालं आहे. 
मुळात अशी लाट येण्याची शक्यता हवामान विभागाने आधीच का नोंदवली नाही?, हा मुद्दा आहे. असो.  अशा परिस्थितीत लहान मुलांच्या शाळांच्या उन्हाळी सुट्ट्या सुरु व्हायला अजून काही काळ असल्यामुळे त्यांना शाळेत जावं लागत आहे. ह्याबाबतीत, जरी आचारसंहिता असली, तरी सरकारने शाळांना आत्ताच उन्हाळी सुट्टी जाहीर करण्याचे निर्देश देण्याची तजवीज करायला हवी. 

राज ठाकरे यांचं श्वानप्रेम सर्वांनांच माहित आहे. अनेकदा त्यांचं हे श्वानांवरील प्रेम  पाहायलाही मिळालं आहे. राज ठाकरेंना प्राण्यांची काळजी करताना दिसत आहे. आता देखील वाढत्या उष्णतेच्या पार्श्वभूमीवर पक्ष्यांची, प्राण्यांची काळजी घेण्याचे आवाहन राज ठाकरे यांनी केले आहे. राज ठाकरे म्हणाले,    माझी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना पण विनंती आहे की, तुम्ही पण उष्णतेच्या लाटेत स्वतःची काळजी घ्या. तसंच ह्या भीषण उन्हाळ्यात सगळ्यात जास्त हाल होतात प्राण्यांचे आणि पक्षांचे (राजकीय नव्हेत ) आणि निराधार आणि बेघर लोकांचे. त्यांना प्यायला स्वच्छ पाणी मिळेल ह्याची तजवीज करा. आणि प्राणी आणि पक्षी तर बिचारे पाणी मागू शकत नाहीत, त्यामुळे, त्यांना सहज पाणी मिळेल आणि सहज पिता येईल अशा पद्धतीने गॅल्लरीत, गच्चीत पाणी ठेवा. 

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain Update | मुंबईत मुसळधार पावसाची हजेरी, मध्ये रेल्वे ठप्प ABP MajhaMumbai Rain : मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP MajhaZero Hour on BJP Marathwada Mission | विदर्भ, मराठवाडा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती? ABP MajhaZero Hour on Opposition Reaction : अमित शाहांच्या दौऱ्याला अर्थ नाही, मराठवाड्यात मविआची ताकद!

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Embed widget