एक्स्प्लोर

अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा

अक्षय शिंदेच्या आई वडिलांना चौकशीसाठी पोलिस घेऊन गेले असून अक्षयच्या वडिलांचा फोन बंद असल्याची माहितीही वकिलांनी दिली.

ठाणे : बदलापूर लैंगिक अत्याचारातील आरोपी अक्षय शिंदे याचा ठाणे पोलिसांकडून (Police) एन्काऊंटर करण्यात आला. या घटनेनंतर पोलिसांच्या कारवाईवर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत. विशेष म्हणजे याप्रकरणी अक्षयच्या वडिलांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेतली असून तातडीने सुनावणीही देखील सुरू झाली आहे. न्यायालयात आज झालेल्या सुनावणीत हायकोर्टाने पोलिसांच्या भूमिकेवर काही प्रश्न उपस्थित केले आहेत. तर, याप्रकरणी त्यांच्या समाजातील रितीरिवाजाप्रमाणे आपण अक्षयचा अंत्यविधी करताना त्याचा मृतदेह जाळण्याऐवजी दफन करण्याचं ठरवल्याचं त्याच्या नातेवाईकांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, आतापर्यंत आरोपी अक्षयचा (Akshay shinde) दफन विधी होणे अपेक्षित होते, पण अद्याप दफन विधी का झाला नाही, असा सवाल उपस्थित करत वकील अमित कटारनवरे यांनी पोलिसांवर गंभीर आरोप केले आहेत. 

अक्षय शिंदेच्या आई वडिलांना चौकशीसाठी पोलिस घेऊन गेले असून अक्षयच्या वडिलांचा फोन बंद असल्याची माहितीही वकिलांनी दिली. अक्षयचा मृतदेह दफन करण्यासाठी अडथळे निर्माण होत आहेत, त्यांना धमक्या दिल्या जात आहेत. तुम्ही कसा अंत्यविधी करतात ते आम्ही बघतो, असा दम दिला जात असल्याचे मी कोर्टाच्या निदर्शनास आणून दिल्याचे वकिल कटारनवरे यांनी म्हटलं आहे. तसेच, तिकडचे डीसीपी, लोकल ऑथोरिटीशी बोलतील आणि त्याच्या अंत्यविधीचा निर्णय ते घेतील, असे सरकारी वकील विनय रावकर यांनी न्यायालयात बोलताना म्हटल होते. मात्र, आता जी माहिती मिळत आहे, त्यानुसार अक्षयच्या वडील-आई यांना पोलिसांनी बोलवले आहे. पोलीस कॉन्स्टेबलशी बोललो तर, सिनिअर साहेबांनी बोलावलं आहे, चौकशीसाठी घेऊन चाललोय, असे सांगण्यात आल्याचे वकिलांनी म्हटले. 

एवढ्या रात्री एका महिलेला पोलीस घेऊन जात असतील, ज्यांचा मुलगा वारला आहे. पोलीस त्यांच्या घरी जाऊ शकत नाहीत का, असा सवाल वकिलांनी विचारला. तसेच, अक्षय शिंदे यांच्या वडिलांचा कॉल लागत नाही, बदलापूर पोलीस स्टेशनला घेऊन गेले असल्याची माहिती आहे. अक्षयच्या नातेवाईकांना त्याचा मृतदेह दफनच करायचा आहे, कोर्टामध्ये देखील त्यांनी तसं सांगितला आहे. सरकार पण म्हणाले आहे आम्ही लोकल ऑथॉरिटीशी बोलून स्टॅन्ड घेणार आहोत, संध्याकाळपर्यंत हे होणं अपेक्षित होते. मात्र, आत्तापर्यंत बॉडी का हवाली केली नाही, हे समजत नाही. जमीन त्यांनी द्यावी, बॉडी आम्ही दफन करू ही आमची विनंती सरकारने मान्य केली आहे. अंत्यविधी आतापर्यंत होणं अपेक्षित होतं. मात्र, त्यांनी आतापर्यंत शिंदे कुटुंबीयांना बॉडी देखील दिली नाही, ही जबाबदारी पोलिसांची आहे, असेही वकील अमित कटारनवरे यांनी एबीपी माझाशी बोलताना म्हटले. 

हेही वाचा

मुंबईत अतिमुसळधार! रेल्वे ट्रॅकवर पाणी भरलं, लोकल आणि एक्सप्रेस गाड्या बंद; प्रवाशांची स्टेशनवर गर्दी

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Mumbai Rain : मुंबईत जोरदार, अंधेरीजवळील वेस्टर्न एक्स्प्रेस हायवेवर वाहतूक कोंडी ABP MajhaZero Hour on BJP Marathwada Mission | विदर्भ, मराठवाडा जिंकण्यासाठी भाजपची रणनीती? ABP MajhaZero Hour on Opposition Reaction : अमित शाहांच्या दौऱ्याला अर्थ नाही, मराठवाड्यात मविआची ताकद!Mumbai Rain School Holiday : मुंबईतील शाळांना सुट्टी जाहीर, दीपक केसरकरांची माहिती

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
International Lottery Day : लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
लॉटरीचा ट्रेंड पुन्हा वाढतोय! आतापर्यंत 13 राज्यांची मंजुरी; एका झटक्यात कोट्यधीश करणाऱ्या लॉटरीचा इतिहास काय? 
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
अक्षय शिंदेचा दफनविधी नाहीच, नातेवाईकांना धमक्या, वडिलांचा फोन बंद; वकील अमित कटारनवरेंचा दावा
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
बीडमध्ये हवाला रॅकेट, काळ्या पैशांची मोठी माया; पोलिसांकडून 32 लाख रुपयांची रोकड जप्त
Devendra Fadnavis In Kolhapur : तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
तर 70 टक्के आमदार महायुतीसाठी पश्चिम महाराष्ट्र देऊ शकतो; देवेंद्र फडणवीसांना काॅन्फिडन्स!
MLA Prakash Awade Joins BJP : आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
आमदार प्रकाश आवाडेंचा मुलासह अमित शाहांच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश; ज्यांची शंका होती तेच दोघांना व्यासपीठावर घेऊन आले!
Sharad pawar: मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
मानवत मर्डर्स वेब सिरीजचं शरद पवार कनेक्शन; आशुतोष गोवारीकरांनी घेतली भेट
Amit Shah In Kolhapur : केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह सासरवाडीतील करवीर निवासिनी श्री अंबाबाईच्या दर्शनाला
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
झेनिथ धबधब्याजवळ वाहून गेली 22 वर्षीय तरुणी; कृष्णा व्हॅलीतील कुटुंबावर दु:खाचा डोंगर
Embed widget