एक्स्प्लोर
राज्यातल्या अनेक भागात मान्सूनपूर्व पावसाची दमदार हजेरी
नाशिक : राज्यातल्या अनेक भागात आज पावसानं जोरदार हजेरी लावली. नाशिक शहरात अनेक ठिकाणी गारांसह मुसळधार पाऊस झाला. तर मनमाड, नंदुरबार, धुळे आदी ठिकाणीही पावसाने दमदार हाजेरी लावली. सोसाट्याच्या वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे अनेक ठिकाणी वीजपुरवठा खंडीत करावा लागला होता.
आज संध्याकाळच्या सुमारास नाशिकमध्ये वादळी वाऱ्यानं पंचवटी, आडगाव परिसरात अनेक ठिकाणी झाडं कोसळण्याच्या घटना घडल्या. तर अनेक ठिकाणी वीजपुरवठाही खंडीत झाला. मनमाडमध्येही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या आहेत.
नंदुरबारमध्ये यंदाच्या मोसमातील पहिला पाऊस झाला. शहादा शहरासह अनेक ग्रामीण भागांमध्ये विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. या पावसानं अनेक गावांतील वीजपुरवठा खंडीत झाला आहे. मात्र वातावरणात निर्माण झालेल्या सुखद गारव्यानं लोकांची उकाड्यापासून सुटका केली आहे.
धुळ्यातही ठिकठिकाणी मेघगर्जनेसह पावसानं हजेरी लावली. तब्बल अर्धा तास कोसळलेल्या वादळी पावसानं ग्रामीण भागासह शहरी भागांतला वीजपुरवठाही ठप्प झाला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement