एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
मराठवाड्यात जोरदार पावसाच्या सरी, बळीराजा सुखावला!
उस्मानाबाद: महिन्याभराच्या प्रतिक्षेनंतर मराठवाड्यात पावसानं जोरदार पुनरागमन केलं आहे. कालपासून मराठवाड्यात जोरदार पाऊस बरसतो आहे.
उस्मानाबादेत 72 तासात तब्बल 85 मिमी पावसाची नोंद करण्यात आला आहे. आज पहाटे मुसळधार पावसाला सुरुवात झाली. काल पहाटेपासून पडत असलेल्या पावसाने दुपारी विश्रांती घेतली होती. रात्री उशीरा रिमझिम पावसाला सुरुवाता झाली. त्यानंतर आज पहाटे पाच वाजेपासून मात्र मुसळधार पाऊस बरसत आहे. दरम्यान ईट परिसरात बारा तासात तब्बल 106 मिमी पावसाची नोंदा झाली आहे. रात्री 2 वाजेपासून जोरदार पावसाच्या सरी बरसत आहेत. तसेच तुळजापूरमध्ये देखील पावसानं हजेरी लावली आहे.
लातूर, उस्मानाबाद, परभणी, नांदेडमध्ये पावसाच्या सरी बरसत असून बीडमध्येही पावसाची संततधार सुरू आहे. या पावसानं बळीराजा सुखावला आहे. शेवटच्या टप्प्यातील पिकांना या पावसानं जीवदान मिळालं आहे.
या पावसामुळे धरणातील पाणी साठ्यात वाढ होण्यास मदत होणार आहे. संपूर्ण पावसाळ्यात मोठा पाऊस न झाल्यामुळं येथील पाणी साठे कोरडे आहेत. आज दिवसभर पाऊस राहिल्यास गणेश मंडळाच्या कार्यकर्त्यांसोबत गणेश भक्तांना गणरायाला निरोप देताना कसरत करावी लागणार आहे.
मुंबई-पुण्यात पावसाच्या जोरदार सरी
मुंबई-पुण्यातही अनेक ठिकाणी पावसाच्या जोरदार सरी कोसळत आहेत. त्यामुळे विसर्जन मिरवणुकांवर पावसाचं सावट निर्माण झालं आहे.
सकाळपासून मुंबईत जोरदार पाऊस पडत आहे. दक्षिण मुंबई, मध्य मुंबईसोबतच पूर्व आणि पश्चिम उपनगरात पावसाची रिमझिम सुरु आहे. तर पुण्यातही पावसाच्या हलक्या सरी कोसळत आहेत.
अहमदनगर जिल्ह्यातही पावसाची हजेरी
अहमदनगर जिल्ह्यात काल संध्याकाळी अनेक ठिकाणी पावसानं हजेरी लावली. कर्जत, शेवगाव, श्रीगोंदा, सुपा आणि पारनेर, राहुरीसह अनेक ठिकाणी चांगला पाऊस बरसला आहे.
काही ठिकाणी विजेच्या कडकडाटासह पाऊस झाला. शहरात सखल भागात पाणीच पाणी साचल्यानं लोकांना पाण्यातून मार्ग काढताना कसरत करावी लागली. दरम्यान आजही पाऊस कायम आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
क्रिकेट
भारत
राजकारण
बुलढाणा
Advertisement