धक्कादायक! रायगडमध्ये दोन दुचाकीची समोरासमोर धडक, दोन जणांचा जागीच मृत्यू
रायगड (Raigad) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे.
Raigad Accident : रायगड (Raigad) जिल्ह्यात धक्कादायक घटना घडली आहे. रायगड जिल्ह्यातल्या रोहा तालुक्यात भीषण अपघात झाल्याची घटना घडली आहे. धाटव एमआयडीसी मधून घरी परतत असताना रोहा कोलाड रोडवरील संभे गावाजवळ दोन मोटरसायकलची जोरदार धडक झााली. यामध्ये दोघांचा जागीच मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे.
दुचाकीची समोरासमोर जोरदार धडक
दरम्यान, या दोन्ही मोटरसायकल वरील युवक हे जोरदार वेगाने जात असताना त्यांची समोरासमोर जोरदार धडक झाली. या घटनेत दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे घटनेने संपूर्ण रोहा शहरात हळहळ व्यक्त होते. अलिकडच्या काळात दिवसेंदिवस अपघातांचे प्रमाणात मोठ्या प्रमाणात वाढले आहे. त्यामुळं प्रवास करताना लोकांच्या मनात भीती आहे. अनेकवेळा अपघातांमध्ये लोकांचा मृत्यू झालेल्या घटना देखील घडल्या आहेत. अपघाताला विविध कारणे देखील आहे. यामध्ये मुख्य मंह्णजे वाहनांचा असणारा वेग, रस्त्यांची दुरावस्था, दारुच्या नशेत वाहने चालवणे, रात्रीच्या वेळी प्रवास करणे, यामुळं मोठ्या प्रमाणात अपघात होत असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे.
दौंडच्या यवत पोलीस ठाण्यात कार्यरत असलेला पोलीस नाईक निखिल रणदिवे आज दुपारपासून बेपत्ता
पुणे जिल्ह्यातील दौंड तालुक्यातून देकील एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. यवत पोलीस ठाण्यामध्ये कार्यरत असलेले पोलीस नाईक निखिल रणदिवे हेआज दुपारपासून बेपत्ता झाल्याची धक्कादायक माहिती मिळाली आहे. यवत पोलिसांकडून निखिल रणदिवे यांचा शोध घेतला जात आहे. सध्या त्यांचा मोबाईल देखील बंद येत आहे. निखिल रणदिवे हे यवत पोलीस ठाण्यांतर्गत असणाऱ्या केडगाव पोलीस चौकीला कार्यरत होते. निखिल रणदिवे यांनी त्यांच्या मुलीचा फोटो व्हाट्सअप स्टेटसला ठेवत एक भावनिक पोस्ट देखील केली आहे. ज्यातून त्यांनी पोलीस खात्यावर आणि यवतचे पोलीस निरीक्षक नारायण देशमुख यांच्यावर गंभीर आरोप देखील केले आहेत. यवत पोलीस स्टेशन येथील अधिकारी नारायण देशमुख मला गेली 1 वर्ष पासुन सतत त्रास देत आहेत. मी माझे जिवाचे बरे वाईट करुन घेत आहे असा गंभीर आरोप रणदिवे यांनी केला आहे. आज दुपारपासून रणदिवे यांचा मोबाईल बंद असून ते अद्याप पर्यंत मिळून आलेले नाहीत त्यामुळे पोलीस खात्यात एकच खळबळ उडाली आहे.
महत्वाच्या बातम्या:
























