अथक प्रयत्नानंतर राधानगरी धरणाचा अडकलेला दरवाजा बंद, मोठं संकट टळलं
कोल्हापूरा जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा दरवाजा तांत्रिक काम करताना अचानक अडकला होता, ज्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग होत होता. ज्यामुळे आसपासच्या गावांना मोठा धोका निर्माण झाला होता.
कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील (Kolhapur) राधानगरी धरणाजवळील (Radhanagri Dam) गावांवरचं मोठं संकट अखेर टळलं आहे. कारण बुधवारी (29 डिसेंबर) सकाळच्या सुमारास तांत्रिक काम करत असताना धरणाचा अडकलेला दरवाजा अथक प्रयत्नानंतर बंद करण्यात यश आलं आहे. त्यामुळे धरणातून होणारा पाण्याचा भलामोठा विसर्ग अखेर थांबला आहे. पाटबंधारे खात्याच्या कर्मचाऱ्यांनी (Irrigation Department Workers) मोठ्या प्रयत्नानंतर हे यश मिळवलं आहे.
महाराष्ट्रातील महत्त्वाच्या धरणांपैकी एक धरण असणाऱ्या कोल्हापुरातील राधानगरी धरणाचं तांत्रिक काम बुधवारी सकाळी सुरू होतं. त्याचवेळी अचानकपणे धरणाचा एक दरवाजा 18 फूटांवर पूर्णपणे उघडून अडकला. दरवाजा मध्येच अडकल्याने भोगावती नदी पात्रात अचानकपणे पाण्याचा विसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला. ज्यामुळे नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशार देण्यात आला होता. यावेळी नदीवर जनावरे तसेच कपडे धुण्यासाठी जाणाऱ्या व्यक्तींनाही जाणे टाळावे असे सांगण्यात आले होते. ज्यानंतर संबधित दरवाजा बंद करण्यासाठी मोठे प्रयत्न सुरु करण्यात आले. अखेर हा तांत्रिक बिघाड दुरुस्त करण्यासाठी पाटबंधारे खात्याची यंत्रणा युद्धपातळीवर कामाला लागली. काही तासांच्या मेहनतीनंतर अखेर दुपारच्या सुमारास जलसंपदा विभागाच्या कर्मचाऱ्यांना हा दरवाजा बंद करण्यात यश आलं. दरम्यान हा दरवाजा अथक प्रयत्नानंतर बंद करण्यात यश मिळाल्याने कोल्हापूरील मोठ संकट टळलं असून कोल्हापुरकरांनी अखेर सुटकेचा निश्वास सोडला आहे.
हे ही वाचा -
- Maharashtra New Year Guidelines : नववर्षाचे स्वागत असे करा! राज्य शासनाची नियमावली जाहीर
- मोठ्या शहरात तिसऱ्या लाटेला सुरुवात, पुढील 6 आठवडे चिंतेचे; टास्क फोर्सचा इशारा
- हळदीवर पाच टक्के जीएसटी लावण्याचा निर्णय, कृषी उत्पन्न बाजार समिती जीएसटी विभागाकडे अपील करणार
मराठी लाईव्ह न्यूज सुपरफास्ट पाहा ABP Majha वर, मुंबई, पुणे, नागपूर, औरंगाबाद, मनोरंजन, क्रिकेट, देश-विदेशातील प्रत्येक बातमी सर्वात आधी एबीपी माझावर Live