पुणे ट्रॅफिक पोलिसांनी बांधली 'सुरक्षेची राखी', सीटबेल्ट न घालणाऱ्यांना दरडावण्याऐवजी अशी लढवली शक्कल, पहा VIDEO
ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढत असताना ट्रॅफिक पोलिसांनी राखी पौर्णिमेचा निमित्त सादर एक अनोखा उपक्रम सुरू केला.
Pune Traffic Police Idea on Rakshabandhan: रक्षाबंधन या सणाला रक्षणाचे प्रतीक म्हणून पाहिलं जातं. आजचा दिवस भाऊ बहिणीसाठी खास मानला जातो. बहिणीच्या रक्षणाचे वचन देत भाऊ बहिणीकडून राखी बांधून घेतो. याच सांस्कृतिक परंपरेचा आणि वाहतुकीच्या नियमांची सांगड घालत पुणे पोलिसांनी एक अनोखी शक्कल शोधून काढली आहे. पुण्यात सध्या वाढतं ट्राफिक आणि वाहतुकीचे नियम तोडणार यांची संख्या लक्षणीय वाढली आहे. ट्राफिक सिग्नल तोडल्याने होणाऱ्या अपघातांचं प्रमाणही वाढत असताना ट्रॅफिक पोलिसांनी राखी पौर्णिमेचा निमित्त सादर एक अनोखा उपक्रम सुरू केला.
रक्षाबंधन सणाला भाऊ आपल्या बहिणीला संरक्षणाचे वचन देतो आणि बहीण भावाला राखी बांधते. याच सांस्कृतिक परंपरेशी सीट बेल्ट न घालणाऱ्यांसाठी जनजागृतीची सांगड घालत पुणे ट्रॅफिक पोलिसांनी भावांना सुरक्षेची राखी बांधलीये. सध्या शहरामध्ये वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांची संख्या वाढली असून नियमांचे वारंवार उल्लंघन होताना दिसतं. यासाठी पुणे ट्रॅफिक पोलिसांनी रक्षाबंधनाचे निमित्त साधत अनोखी शक्कल लढवली आहे.
सीटबेल्ट न घालणाऱ्यांना दरडावण्याऐवजी..
पुण्यातील महिला ट्रॅफिक पोलिसांनी सीट बेल्ट न घालणाऱ्यांना दरडवण्याऐवजी आता सुरक्षेची राखीच बांधली आहे. शहरात वाहतुकीचे नियम मोडण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असताना तसेच पोर्से कार अपघातासारख्या घटना होऊ नयेत यासाठी पुणे ट्रॅफिक महिला पोलिसांनी हा अनोखा उपक्रम हाती घेतलाय. एरवी नियम मोडला की पावती फाडणाऱ्या महिला ट्रॅफिक पोलीस आज चक्क सीटबेल्टचा महत्त्व समजावून सांगत सीटबेल्ट सारखी दिसणारी राखी घालून सुरक्षेची राखी बांधताना दिसतायत. विशेष म्हणजे सीट बेल्ट सारखी दिसणारी राखी बांधल्यानंतर ओवाळणी म्हणून आयुष्यभर सीट बेल्ट घालून प्रवास करेन असं वचन सुद्धा त्या भाऊरायाकडून घेतायत.
या उपक्रमाची चित्रफीत पुणे पोलिसांच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सर्वत्र प्रदर्शित करण्यात आली आहे. या उपक्रमाचे सर्व स्तरांमधून कौतुक होत आहे.
View this post on Instagram
पुणे पोलिसांनी दिल्या रक्षाबंधनाच्या शुभेच्छा
वाढणाऱ्या अपघातांचं प्रमाण कमी करण्यासाठी हा उपक्रम महत्वाचा मानला जात असून पुणे पोलिसांनी या व्हिडिओ इन्स्टाग्रामवर टाकला आहे. आणि नागरिकांना राखीपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
नाते अतूट प्रेमाचे!
भाऊ म्हंटलं की बहिणीच्या मायेचं पारडं त्याच्यासाठी नेहमीच भरलेलं असतं, प्रत्येक बहिणीसाठी त्याचे जीवन सुखकर आणि उदंड आयुष्याचे असावे असे तिला वाटते. म्हणूनच या मायेची जाणीव ठेऊन या रक्षाबंधनला तुमच्या बहिणीला या सुरक्षेचे वचन द्या.
राखी पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा!
#Rakshabandhan #सुरक्षेची_राखी
हेही वाचा: