एक्स्प्लोर
Advertisement
शिवसेनेच्या जुन्नरमधील नेत्या आशा बुचके यांची पक्षातून हकालपट्टी
लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला होता. शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली आहे.
पुणे : शिवसेनेने पुणे जिल्हा परिषदेच्या सदस्या आणि जुन्नरमधील नेत्या आशा बुचके यांची हकालपट्टी केली आहे. तसंच पुणे जिल्हाप्रमुख राम गावडे यांनाही पदावरुन दूर केलं आहे. त्यांच्या जागी जिल्हा परिषद सदस्य माऊली कटके यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लोकसभा निवडणुकीत पक्षाविरोधात कारवाई केल्याप्रकरणी शिवसेनेने ही कारवाई केली आहे.
या निर्णयामुळे शिवसेनेत खळबळ उडाली आहे. लोकसभा निवडणुकीत शिरुर मतदारसंघात माजी खासदार शिवाजीराव आढळराव पाटील यांचा पराभव झाला होता. राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अमोल कोल्हे यांनी शिवाजीराव आढळराव पाटील यांना पराभूत केलं होतं. परंतु हा पराभव शिवसेनेच्या जिव्हारी लागला आहे.
विशेष म्हणजे शिवाजीराव आढळराव पाटील यांची शिवसेनेच्या उपनेतेपदी नियुक्ती झाल्यानंतर या कारवाईला सुरुवात झाली आहे. पुणे शहरातील दोन प्रमुख माजी आमदार चंद्रकांत मोकाटे आणि महादेव बाबर यांनाही दोन दिवसांपूर्वी पदावरुन दूर करण्यात आलं होतं.
कोण आहेत आशा बुचके?
- आशा बुचके या 2002 पासून जिल्हा परिषदेच्या सदस्या आहेत.
- त्यांनी 2009 आणि 2014 मध्ये शिवसेनेकडून विधानसभेची निवडणूक लढवली होती.
- लोकसभा निवडणुकीच्या काही दिवस आधी शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या शरद सोनवणे यांना विरोध केला होता.
- यानंतर बुचके समर्थकांनी उद्धव ठाकरे यांच्या‘मातोश्री’ निवासस्थानी गोंधळ घालण्याचा प्रयत्न केला होता. त्यावरुन त्यांना खडे बोलही सुनावले होते.
- या गटबाजीचा सर्वाधिक फटका जुन्नरमध्ये बसला. राष्ट्रवादीचे उमेदवार अमोल कोल्हे 46 हजारांच्या मताधिक्याने निवडून आले.
- अखेर लोकसभा निवडणुकीतील प्रचारात पक्षाविरोधात काम केल्याचा ठपका ठेवून बुचके यांची अखेर हपक्षाबाहेर काढण्यात आले.
- आशा बुचके यांच्या हकालपट्टीमुळे शरद सोनवणे यांनी जुन्नर विधानसभेची उमेदवारी निश्चित झाल्याचं म्हटलं जात आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
महाराष्ट्र
व्यापार-उद्योग
क्राईम
क्राईम
Advertisement