Pune PMPML News : पुण्यातील ग्रामीण भागातल्या 11 मार्गावर PMPML ची सेवा बंद होणार, वाचा ते 11 मार्ग कोणते?
26 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून पुण्यातील ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची (PMPML) वाहतूक सेवा बंद होणार आहे.
Pune PMPML News : पुणे (Pune) जिल्ह्यातील ग्रामीण भागाील प्रवाशांसाठी (Travelers in rural areas) एक महत्त्वाची बातमी आहे. 26 नोव्हेंबरपासून म्हणजेच उद्यापासून पुण्यातील ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची (PMPML) वाहतूक सेवा बंद होणार आहे. ग्रामीण भागात सुरु केलेल्या मार्गावर कमी उत्पन्न होत असल्यानं PMPML कडून हा मोठा निर्णय घेण्यात आला आहे. तर पुणे आणि पिंपरी चिंचवड (Pimpri Chinchwad) शहरात ज्यादा बसेस सोडण्याचा निर्णय देखील घेण्यात आला आहे.
दरम्यान, ग्रामीण भागातील 11 मार्गावरील पीएमपीएलची सेवा होणार बंद होणार असल्यानं दररोज प्रवास करणाऱ्या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. त्यामुळं आता या निर्णयावर आता ग्रामीण भागातील प्रवासी नेमकी काय भूमिका घेणार हे पाहणं देखील महत्वाचं ठरणार आहे.
'या' 11 मार्गावरील PMPML बससेवा बंद होणार
1) स्वारगेट ते काशिंगगाव
2) स्वारगेट ते बेलावडे
3) कापूरहोळ ते सासवड
4) कात्रज ते विंझर
5) सासवड ते उरुळी कांचन
6) हडपसर ते मोरगाव
7) हडपसर ते जेजुरी
8) मार्केटयार्ड ते खारावडे
9) वाघोली ते राहूगाव, पारगाव
10) चाकण ते शिक्रापूर फाटा
11) सासवड ते यवत
या मार्गावरील बससेवा बंद होणार आहे. त्यामुळं ग्रामी भागातील प्रवाशांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे.
पुण्याच्या PMPML बसने ग्रामीण भागानं पाठ फिरवली आहे. ग्रामीण भागातील मार्गावर उत्पन्न कमी होत असल्यानं हा निर्णय घेण्यात आला आहे. उद्यापासून हा निर्णय लागू होणार आहे. पीएमपीएमएलने घेतलेल्या या निर्णयाचा काही ग्रमीण भागातील नागरिकांना त्रास होण्याची शक्यता आहे. ग्रामीण भागात रोजचा प्रवास करणाऱ्या तुरळक व्यक्ती आहेत. त्यामुळे बस सेवाचा पर्याय बंद केल्याने या नागरिकांचा खोळंबा होण्याची शक्यता आहे. पीएमपीएमएलचे अध्यक्ष ओमप्रकाश बकोरिया यांनी हा निर्णय घेतला आहे. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार ग्रामीण भागात सुरु असलेले एकूण 40 मार्ग बंद होणार आहेत. त्यापैकी पहिल्या टप्प्यात 11 मार्ग बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या संकटानंतर आणि एसटी संपाच्या काळात PMPML ने ग्रामीण भागात बस सुरु करण्याचा निर्णय घोतला होता. आता एसटी कर्मचाऱ्यांचा संप मिटला आहे. बससेवा देखील सुरु झाली आहे. त्यामुळं PMPML ने ग्रामीण भागातील 11 मार्गावरील बससेवा बंद करण्याचा निर्णय घेतला आहे.
महत्त्वाच्या बातम्या: