एक्स्प्लोर

Pune PMPML : दमदाटी संपेनाच! पीएमपीएमएल चालकाची अन् तरुणाची तुंबळ हाणामारी; व्हिडीओ व्हायरल

पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये झाला वाद आणि या वादाचे रुपांतर झाले हाणामारीत झालं.

Pune PMPML : पीएमपीएल बस चालक (PMPML) आणि दुचाकी चालकामध्ये (Pune) तुंबळ हाणामारी झाली आहे. गाडी ओव्हर टेक करण्याच्या कारणावरुन पीएमपी चालक दुचाकी चालकामध्ये झाला वाद आणि या वादाचे रुपांतर झाले हाणामारीत झालं. पुण्यातील पुणे स्टेशन परिसरात काल (13 नोव्हेंबर) ही घटना घडली. या प्रकरणी बंडगार्डन पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे. 

या मारहाणीचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे. त्यात दुचाकी चालकाने पीएमपीएमएलच्या चालकाला चपलेने बेदम मारहाण केली आहे. त्यानंतर वाहकाने हा प्रकार पाहिला आणि वाहक देखील बसच्या खाली उतरला. त्याने देखील मारहाण करायला सुरुवात केली. त्या वाहकाला देखील दुसऱ्या तरुणाने मारहाण करायला सुरुवात केली. त्यावेळी शेजारचे लोक त्याठिकाणी बचावासाठी आले, मात्र दोघेही थांबायला तयार नसल्याचं व्हिडीओत दिसून येत आहे. 

हाणारामारीमुळे काही वेळ वाहतूक कोंडी
पुण्यातील पुणे स्टेशनच्या परिसरात कायम मोठी रहदारी असते. याच रस्त्यावर पीएमपीएल बस चालक आणि दुचाकी चालकामध्ये तुंबळ हाणामारी झाल्याने काही वेळ वाहतूक कोंडी झाली होती. अनेक लोक हाणामारीमुळे खोळंबले होते. घडल्या प्रकरणी बंडगार्डन पोलीस ठाण्यात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

चालकांच्या हल्ल्यामध्ये वाढ
पुण्यात पीएमपीएमएलच्या चालक किंवा वाहकांच्या हल्ल्यांमध्ये वाढ झाली आहे. दोन दिवसांपूर्वी पिंपरी-चिंचवडमध्ये एका तरुणाने चक्क पीएमपीएमएलच्या चालकाला बेदम मारहाण केल्याचा प्रकार समोर आला होता. बसला एक दुचाकी आडवी येत होती ती काढायला लावली या कारणावरुन त्याने शिवीगाळ केली आणि बेदम मारहाण केली होती. पिंपरी चिंचवडमधील नेहरुनगर परिसरातील संतोषी माता चौकामध्ये भर दिवसा हा प्रकार घडला होता. पीएमपीएमएल बसचं संचलन सुरु होतं. यावेळी रस्त्यात संतोषी माता चौकात एक दुचाकी आडवी येत होती. त्यावेळी चालकाने तरुणाला गाडी बाजूला करण्यासाठी सांगितलं होतं. मात्र याचा तरुणाला राग आला आणि तुला माहित आहे का, मी कोण आहे? असं म्हटलं. यावरुन दोघांंमध्ये किरकोळ वाद झाला होता. त्यानंतर मुलाने थेट बसमध्ये प्रवेश केला आणि चालकाला मारहाण केली होती. ऋषिकेश घोडेकर असं या तरुणाचं नाव होतं.

पीएमपी प्रशासनाकडून गंभीर दखल 
सतत होत असलेल्या घटनांमुळे प्रशासनाची या घटनांची गंभीर दखल घेतली आहे. त्यांनी वाहन चालक किंवा मालक यांची काही तक्रार असेल तर त्यांच्याशी वादावादी करु नका. 020-24545454 यानंबरवर त्यांनी तक्रार नोंदवा, असं आवाहन प्रशासनाने पुणेकरांना केलं आहे. 

 

महत्त्वाच्या बातम्या

MPSC पेपरफुटी प्रकरण! विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा हा सरकारच्या अपयशाचा पुरावा, जनाची नाही मनाची तरी असेल तर... रोहिणी खडसे संतापल्या
MPSC पेपरफुटी प्रकरण! विद्यार्थ्यांचा आक्रोश मोर्चा हा सरकारच्या अपयशाचा पुरावा, जनाची नाही मनाची तरी असेल तर... रोहिणी खडसे संतापल्या
Radha Patil: नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
नृत्यांगणा राधा पाटीलसह तिघांवर गुन्हा; पुण्यातील दहीहंडी कार्यक्रम अंगलट; पोलिसांकडून अधिक तपास सुरू
Pune Pimpri Chinchwad : ना नाव सांगता येतंय, ना घरचा पत्ता, दीड वर्षांचं गोंडस लेकरु शोधतंय आई-बाबांना; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचं आवाहन
ना नाव सांगता येतंय, ना घरचा पत्ता, दीड वर्षांचं गोंडस लेकरु शोधतंय आई-बाबांना; पिंपरी चिंचवड पोलिसांकडून मदतीचं आवाहन
Rohit Pawar: विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षेत भ्रष्टाचार होतोय अन् प्रश्न विचारायचे नाहीत, यात राजकारण कुठून आलं? MPSC विद्यार्थ्यांसोबत रोहित पवार रस्त्यावर उतरले
विद्यार्थ्यांचं भविष्य घडवणाऱ्या परीक्षेत भ्रष्टाचार होतोय अन् प्रश्न विचारायचे नाहीत, यात राजकारण कुठून आलं? MPSC विद्यार्थ्यांसोबत रोहित पवार रस्त्यावर उतरले

व्हिडीओ

Pune DJ Morcha : पुण्यात डीजेविरोधात मोर्चा, विद्यानंद बापटांच्या दांडीची चर्चा | Special Report ABP Majha
Manoj Jarange Uposhan : जरांगेंची आरपारची लढाई, मिशन आरक्षण Special Report
Rahul Gandhi on MPSC : MPSC वर भाजपचा ताबा? Special Report
OBC Vs Maratha : 2 सप्टेंबरचा GR रद्द करा, मनोज जरांगेंच्या अंतरवालीत ओबीसी आक्रमक
Raj Thackeray Thane Speech : अमित ठाकरेंनी पंतप्रधानांचा फोटो हटवला; आता राज ठाकरे इशारा देत म्हणाले

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
जागतिक फिजिओथेरपी दिन; ‘वर्क फ्रॉम होम’ अंगलट येतय का? पाठदुखीच्या समस्या वाढल्याचं समोर
Pakistan Cricket Crisis : 'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
'भारताविरुद्धचा 'तो' विजयच आमचा काळ ठरला!' पाकिस्तान क्रिकेटच्या उद्ध्वस्तावर मोहम्मद युसूफला अश्रू अनावर
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
ABP माझा टॉप 10 हेडलाईन्स | 07 सप्टेंबर 2026 | सोमवार
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
राज ठाकरे दुसऱ्यांदा बनले आजोबा; अमित मितालीने दिली गोड बातमी, ठाकरे कुटुंबीयांत आनंदी आनंद
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
मुंबईतील विशाखा राऊतांचे नगरसेवकपद रद्द, सदा सरवणकरांवर गंभीर आरोप; म्हणाल्या, उद्धव ठाकरेंना भेटणार
Dharmveer Gad : 'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
'धर्मवीर गड' आता राज्य संरक्षित स्मारक घोषित, याच ठिकाणी छत्रपती संभाजीराजेंना छळलं, पराक्रमाच्या स्मृतींचे संवर्धन होणार
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
मन हेलावणारी दुर्घटना; रिक्षा अन् पिकअपचा भीषण अपघात, आईसह दोन लहानग्यांचा मृत्यू, परिसरात हळहळ
LPG Refill Booking : ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
ग्रामीण भागातील एलपीजी ग्राहकांना दिलासा, गॅस सिलेंडर बुकिंगच्या 45 दिवसांच्या नियमात बदल, नवी अपडेट जाणून घ्या
Embed widget