एक्स्प्लोर
पुणे मेट्रोचं भूमीपूजन पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते करणार : काँग्रेस
पुणे : पुणे मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप-राष्ट्रवादीतला वाद शमत नाही तोवरच आता काँग्रेसने यात उडी घेतली आहे. पुण्यात स्वारगेट येथे काँग्रेसकडून 23 डिसेंबरलाच मेट्रोचं भूमीपूजन करण्यात येईल, असं वक्तव्य पुण्याचे काँग्रेस अध्यक्ष रमेश बागवे यांनी केलं आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते 24 डिसेंबरला पुणे मेट्रोचं भूमीपूजन करण्यात येणार आहे. मात्र त्याआधीच काँग्रेसने मेट्रोच्या भूमीपूजनावरुन भाजप आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी नवी खेळी आखली आहे.
... म्हणून पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते भूमीपूजन
पुणे मेट्रोला पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असताना मान्यता मिळाली होती. पुण्यात मेट्रो आणण्याच्या निर्णयात त्यांचा महत्वाचा वाटा आहे, असा दावा रमेश बागवे यांनी केला आहे. त्यामुळेच पृथ्वीराज चव्हाणांच्या हस्ते 23 डिसेंबरला सकाळी 10 वाजता काँग्रेसकडून भूमीपूजन करण्यात येईल, असं बागवे यांनी सांगितलं.
पुणे मेट्रोचं भूमीपूजन शरद पवारांच्या हस्ते व्हावं, असा ठराव महापालिकेत काँग्रेसच्या पाठिंब्यानेच मंजूर करण्यात आला होता. मात्र पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी भाजपसोबत दिलजमाई केली. या निर्णयावरुन यू टर्न घेत शरद पवार केवळ कार्यक्रमाला उपस्थित असतील, यावरच सहमती दर्शवली, असा आरोप रमेश बागवे यांनी केला आहे.
राष्ट्रवादीने हा निर्णय घेतल्यामुळे काँग्रेसने भाजप आणि राष्ट्रवादीला शह देण्यासाठी ही नवी खेळी आखली आहे.
भाजप-राष्ट्रवादीचा वाद
पुणे मेट्रो भूमीपूजनवरुन राष्ट्रवादी आणि भाजपमधील वाद सध्या निवळला आहे. 24 डिसेंबरला होणाऱ्या मेट्रोच्या भूमीपूजन कार्यक्रमाला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी व्यासपीठावर एकत्र येणार आहेत.
पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी ही माहिती दिली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मध्यस्थीनंतर राष्ट्रवादीने एक पाऊल मागे घेतलं. त्यामुळे 23 डिसेंबरचा पुणे मेट्रो भूमीपूजनाचा प्रस्तावित कार्यक्रम रद्द करत असल्याचं राष्ट्रवादीकडून सांगण्यात येत आहे.
शरद पवारांना 24 तारखेच्या कार्यक्रमाला न बोलावल्यास राष्ट्रवादी काँग्रेस 23 तारखेला संध्याकाळी मेट्रोचं भूमीपूजन करणार, असा इशाराही पुण्याचे महापौर प्रशांत जगताप यांनी दिला होता.
संबंधित बातम्या :
पुणे मेट्रोचं मोदींच्या दौऱ्यापूर्वीच भूमीपूजन करणार, राष्ट्रवादीचा इशारा
पवार-मोदी 24 डिसेंबरला व्यासपीठावर एकत्र येणार!
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
राजकारण
राजकारण
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement