Pune Ganeshotsav 2023 : कोणी पालखीत तर कोणी बैलगाडीत; पुण्याचे मानाचे गणपती दिमाखात विराजमान
पुण्यात जल्लोषात गणेशोत्सवाला सुरुवात झाली. पारंपारिक पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तर परंपरेनुसार मानाच्या पाच गणपतींची ठरलेल्या वेळांप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
पुणे : पुण्यात जल्लोषात गणेशोत्सवाला (Pune ganeshotsav 2023) सुरुवात झाली. पारंपारिक पद्धतीने श्रीमंत दगडूशेठ गणपतीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली तर परंपरेनुसार मानाच्या पाच गणपतींची ठरलेल्या वेळांप्रमाणे प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. यावेळी पुण्यातील मध्यवर्ती परिसरात आनंदमय आणि भक्तीमय वातावरण झालं होतं. शिवाय शेकडो ढोल पथकं आणि पुणेकरांच्या गर्दीने परिसर दुमदुमला होता.
पुण्यातील मानाता पहिला कसबा गणपतीची पालखीत मिरवणूक निघाली. अत्यंत पारंपारिक पद्धतीने मंडळातर्फे ही मिरवणूक काढण्यात आली. त्यानंतर डॉ. आनंद उर्फ नरसिंह एकनाथ गोसावी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुण्यीतल मानाचा दुसऱा तांबडी जोगेश्वरी गणपतीची शंख वादनानंतर मिरवणुकीला सुरुवात झाली होती. त्यानंतर ढोल वादनाने अत्यंत पारंपारिक पद्धतीने पालखीतून गणपतीला उत्सव मंडपात नेण्यात आलं. त्यानंतर श्री समर्थ घराण्याचे अकरावे वंशज आणि सज्जनगड येथील भूषण महारुद्रा स्वामी महाराज यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
पुण्यातील मानाचा तिसरा गुरुजी तालीम गणपतीची मिरणुकीत ढोल ताशांचा जल्लोष बघायला मिळाला. यावेळी लक्ष्मी रोडवर हजारोंच्या संख्येत पुणेकर जमले होते. श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपती ट्रस्टचे विश्वस्त आणि उत्सवप्रमुख पुनीत बालन आणि जान्हवी धारिवाल-बालन यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
मानाचा चौथा तुळशीबाग गणपतीची मिरवणूक जल्लोषात पार पडली. यावेळी लहानगेही सहभागी झाले होते. तुळशीबागेतील गणपती हा व्यापाऱ्यांचा गणपती मानला जातो. त्यामुळे व्यापारीही सहभागी झाले होते. दि पूना मर्चंट्स चेंबर्सचे अध्यक्ष राजेंद्र बाठिया आणि जयराज अँन्ड कंपनीचे राजेश शहा यांच्या हस्ते प्रतिष्ठापना करण्यात आली.
त्यानंतर पुणेकरांला लाडका बाप्पा प्रसिद्ध श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीच्या प्राणप्रतिष्ठापनेसाठी सकाळी साडेआठ वाजता मुख्य मंदिरापासून श्री हनुमान रथातून श्रींची मिरवणूक निघाली. रितीरिवाजानुसार आणि धर्मपरंपरेनुसार आकर्षक फुलांच्या श्री हनुमानाच्या चार मूर्ती रथावर मिरवणूक काढण्यात आली. कोतवाली चावडी येथील पारंपारिक जागेत श्रीराम मंदिर अयोध्या या प्रतिकृती बाप्पा विराजमान झाले सरसंघचालक डॉ मोहन भागवत यांच्या हस्ते श्रींची प्रतिष्ठापना करण्यात आली. यामध्ये लहानांपासून थोरांपर्यंत गणेश भक्त उपस्थित होते.
हिंदूस्थानातला पहिला गणपती अशी ओळख असलेला भाऊ रंगारी गणपतीची मिरवणूक बैलगाडीवरुन काढण्यात आली. यावेळी पुनीत बालन आणि जान्हवी धारीवाल यांची या बैलगाडीचं सारथ्य केलं. भव्य दिव्य देखाव्यांसाठी (Pune Ganeshotsav 2023 ) प्रसिध्द असलेल्या ‘श्रीमंत भाऊसाहेब रंगारी गणपतीच्या मिरवणुकीला दिमाखात सुरुवात झाली आहे. कलावंत पथकाच्या गजरात या मिरवणुकीला सुरुवात झाली आहे. अनेक मराठी कलाकार या मिरवणुकीत ढोल ताशाच्या वादनाचा अनुभव या मिरवणुकीत घेत आहे. यंदा काल्पनिक ‘ॐकार महाल’ हा देखावा साकारण्यात आला आहे.
इतर महत्वाची बातमी-
Pune Ganeshotsav 2023 : पुण्यात गणेशोत्सवामुळे पुढील 11 दिवस ड्रोनवर बंदी; पुणे पोलिसांचा आदेश