एक्स्प्लोर
Advertisement
(Source: ECI/ABP News/ABP Majha)
कोकणात पावसाचा जोर वाढला, महाराष्ट्रात अनेक ठिकाणी जोरदार सरी
सिंधुदुर्ग: कोकणात मान्सनपूर्व पावसाचा जोर वाढलेला पाहायला मिळतो आहे. सिंधुदुर्ग जिल्हात मान्सून पूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सावंतवाडी, कुडाळ, दोडामार्ग, कणकवली, वैभववाडी, देवगड मध्ये काल रात्री जोरदार पाऊस झाला. तर आताही रत्नागिरी, राजापूर, लांजा या परिसरात जोरदार पावसाच्या सरी कोसळत आहेत.
काल दिवसभर पावसाच्या सरी अधूनमधून सुरूच होत्या मात्र रात्री दहाच्या सुमारास सुरु झालेल्या पावसाची अर्धा तास रिपरिप सुरुच होती. त्यामुळे खारेपाटण ते बांदा महामार्गावरील वाहतूकही धीम्या गतीने सुरु होती.
तिकडं रत्नागिरीतही पावसाच्या जोरदार सरी बरसल्या, रत्नागिरीसह राजापूर, चिपळून, लांजाच्या किनारपट्टीच्या भागात मान्सूनपूर्व पावसाचा जोर चांगलाच पाहायला मिळाला. अनेक भागात वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. यामुळं रत्नागिरीसह अनेक भागातला वीज पुरवठा काही काळासाठी खंडीत झाला होता.
कोकणाप्रमाणं मराठवाड्यातही मान्सूनपूर्वचा चांगलाच जोर पाहायला मिळतो आहे. बीड शहरात काल रात्री वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. त्यामुळं उकाड्यानं हैराण झालेल्या बीडकरांना थोडा दिलासा मिळाला. तर सांगली शहरात पहाटेपासून पावसाची संततधार आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
जॅाब माझा
राजकारण
करमणूक
राजकारण
Advertisement