एक्स्प्लोर

कोरोना पॉझिटिव्ह बाळंतीणीस रुग्णालयातून बाहेर काढलं, हिंगोली शासकीय रुग्णालयातील प्रकार

पाच दिवसापूर्वी सिझेरीयन करुन प्रसुत झालेल्या ओल्या बाळंतीणीस चक्क रुग्णालयातून बाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयात आज सोमवारी दुपारी घडला.

हिंगोली : सिझेरियन होऊन बाळंतीण झालेल्या एका महिलेला कोरोना झाल्याचा अहवाल प्राप्त होताच, तिला सरकारी रुग्णालय प्रशासनाने रुग्णालयातून बाहेर काढल्याचा धक्कादायक प्रकार उघड झाला आहे. या घटनेमुळे कोरोनाचा द्वेष करण्यापेक्षा आजारी लोकांचाच द्वेष करण्यात येत असल्याचे स्पष्ट झाले आहे. शिवाय रुग्णालय प्रशासनाची बेपरवाई सुद्धा दिसून येत आहे.

दुसऱ्या एका बाळंतीणीने पाच दिवसापूर्वी सिझेरीयन करुन प्रसूत झालेल्या ओल्या बाळंतीणीस चक्क रुग्णालयातून बाहेर काढण्याचा संतापजनक प्रकार वसमत येथील शासकीय महिला रुग्णालयात आज सोमवारी दुपारी घडला. वसमत शहरातील पठान मोहल्ला भागातील महिला 22 जुलै रोजी प्रसुतीसाठी शासकीय रुग्णालयात दाखल झाली होती. सिझेरीयन करत प्रसुतीनंतर तिला कन्यारत्न प्राप्त झाले. कन्यारत्न झाल्याने कुटुंबीय आंनदात होते. मात्र अचानक आज सदर महिलेचा कोरोना अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे वृत्त रुग्णालयात धडकले. यानंतर पाच दिवसाच्या ओल्या बाळंतीणीला चक्क एका टॅक्सी ऑटोमध्ये बसवून उपजिल्हा रुग्णालयात काढून दिले. हा प्रकार पाहून बाळंतीण भांबावून गेली.

वास्तविक कोरोनाच्या लढयात डॉक्टर, नर्सेस आणि आरोग्य यंत्रणेला देवस्वरुप स्थान दिले जात असताना हा संतापजनक प्रकार घडावा, हे निंदनीय आहे. स्त्री रुग्णालयातून प्रसुती झालेली महिला रिक्षातून आल्यानंतर तिथे बाळंतीणीसमोर प्रश्नाची सरबत्ती सुरु झाली. तुम्ही बाळंतीण असताना इथे कशाला आल्या म्हणत सदर महिला पुन्हा त्याच रिक्षातून महिला रुग्णालयात पोहोचली. हा प्रकार नातेवाईकांना समजताच त्यांनी रुग्णालयातील डॉक्टरांना धारेवर धरत जाब विचारताच प्रकरण अंगलट येईल, असे दिसताच रुग्णवाहिका बोलावून महिलेला उपजिल्हा रुग्णालयात भरती करुन घेतले. आता महिलेच्या सोबतच्या नातेवाईकांना क्वॉरंटाईन होण्याचा सूचना देण्यात आल्या असून रिक्षाचालकाचा शोध सुरु झाला आहे.

दरम्यान स्त्री रुग्णालय प्रसूत झालेल्या बाळंतीणीला आणि पाच दिवसाच्या चिमुकलीला ज्या पद्धतीची वागणूक दिली ती चुकीची असून यातून स्त्री रुग्णालय प्रशासनाच्या निष्काळजीपणा समोर आला आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव वाढवून नागरिकांचे जीव धोक्यात आणल्याप्रकरणी संबधित डॉक्टर, जबाबदार कर्मचाऱ्यांविरूद्ध आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कारवाई करण्याची मागणी मुस्लीम सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष नदीम सौदागर, एमआयएमचे युवक शहराध्यक्ष पठाण यांनी उपविभागीय अधिकारी, वसमत यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Narhari Zirwal : मंत्रालयाच्या गेटवरील प्रसंगावर नरहरी झिरवाळ यांचं स्पष्टीकरणUday Samant : मराठी भाषेला त्रास देणाऱ्यांना... उदय सामंतांचं भाषण Pune Vishwa Marathi SammelanGunaratna Sadavarte On Suresh Dhas भाजप नेत्यांनी सुरेश धसांना समज द्यावा, त्यांच्यावर हक्कभंग आणावाABP Majha Marathi News Headlines 12 PM TOP Headlines 12PM 31 January 2024 दुपारी १२ च्या हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Santosh Deshmukh Case : मोठी बातमी : संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
संतोष देशमुख प्रकरणातील मुख्य आरोपी सुदर्शन घुलेचा तुरुंगातील मुक्काम वाढला
Arvind Kejriwal : यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
यमुना नदीत विष कालवल्याचा आरोप दिल्ली निवडणुकीत भलताच पेटला; माजी सीएम केजरीवाल थेट निवडणूक आयोगाच्या कार्यालयात पोहोचले अन्...!
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
नाशिक-रायगड पालकमंत्रिपदाचा निर्णय लांबणीवर, शिंदे-अजितदादा ठाम, मुख्यमंत्र्यांच्या दिल्ली दौऱ्यानंतरच तोडगा निघणार?
Dhananjay Munde: भगवानगड आणि नामदेवशास्त्रींच्या पाठिंब्यासारखी दुसरी ताकद नाही, नव्या आत्मविश्वासाने काम करेन: धनंजय मुंडे
माझ्या पाठिशी भगवानगड आणि न्यायाचार्यांची ताकद उभी राहिलेय, माझा आत्मविश्वास वाढलाय: धनंजय मुंडे
Accident : भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
भरधाव बोलेरो पिकअपची आयशरला भीषण धडक, प्रवाशी अक्षरश: बाहेर फेकले गेले; 9 जणांचा मृत्यू, 11 जण गंभीर जखमी
Sunita Williams : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Video : सुनीता विल्यम्स यांचा 15 दिवसात दुसऱ्यांदा स्पेसवॉक, वयाच्या 59व्या वर्षी अंतराळात केला भीम पराक्रम; संशोधनासाठी घेतले सूक्ष्मजीवांचे नमुने
Nitesh Rane : परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
परीक्षा केंद्रावर बुरखा नको, नितेश राणेंना मुस्लीम विद्यार्थिनींकडून ओपन चॅलेंज; शिक्षण मंत्र्यांकडे मोठी मागणी
Bhagwangad Namdev Shastri: ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
ज्यांनी संतोष देशमुखांना मारलं, त्यांची मानसिकताही विचारात घ्यायला हवी, धनंजय मुंडेंची पाठराखण करताना नामदेवशास्त्री काय म्हणाले?
Embed widget