एक्स्प्लोर
'ते' वक्तव्य अनवधानानं निघालं', परिचारकांचा माफीनामा
पंढरपूर : विधान परिषदेचे आमदार प्रशांत परिचारक यांनी आपल्या वक्तव्याबद्दल जाहीर माफी मागितली आहे. अनवधानाने आपल्याकडून असं वक्तव्य निघालं, कुणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नव्हता, असं म्हणत त्यांनी सैनिक आणि महिलांची माफी मागितली आहे.
पंढरपूर तालुक्यातील भाजप उमेदवाराच्या प्रचारसभेत बोलताना परिचारकांनी राजकारणाची व्याख्या करताना देशाच्या जवानांचा अपमान केला होता. त्यानंतर त्यांच्यावर सोशल मीडियातून मोठ्या प्रमाणात टीका करण्यात आली. मात्र परिचारकांशी या वक्तव्यानंतर संपर्क होऊ शकला नव्हता. अखेर त्यांनी जाहीर माफी मागितली आहे.
अनवधानाने माझ्याकडून असं वक्तव्य निघालं, यासाठी मी सर्व सैनिक बांधवांची आणि महिलांची माफी मागतो. कुणालाही दुखावण्याचा हेतू नव्हता, तरीही सर्वांची माफी मागतो, असं परिचारक यांनी म्हटलं आहे.
परिचारकांचं वक्तव्य
”पंजाबमधील सैनिक एकदाही घरी न येता वर्षभर सिमेवर लढत असतो. आणि त्याला फोन येतो तुला मुलगा झाला. त्या आनंदात तो पेढे वाटतो,’’ असं वक्तव्य परिचारक यांनी केलं होतं.
संबंधित बातमी : आमदार प्रशांत परिचारक यांची प्रचार सभेत जीभ घसरली
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement