एक्स्प्लोर
गुजरातचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचा पॅटर्न वापरा : प्रकाश आंबेडकर
![गुजरातचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचा पॅटर्न वापरा : प्रकाश आंबेडकर Prakash Ambedkar Vs Cm Devendra Fadnvis गुजरातचं कौतुक करण्यापेक्षा त्यांचा पॅटर्न वापरा : प्रकाश आंबेडकर](https://static.abplive.com/wp-content/uploads/sites/4/2016/06/23230537/prakash-ambedkar-1-270x202.jpg?impolicy=abp_cdn&imwidth=1200&height=675)
अकोला : सलग तीन वर्षांपासून महाराष्ट्र दुष्काळानं होरपळतो आहे. परिणामी शेतकऱ्यांच्या हाती पैसा नाही. मराठवाड्यात तर शेकडो शेतकऱ्यांनी मरण जवळ केलं आहे. अशा स्थितीत तोंडभरुन गुजरातचं कौतुक करणाऱ्या मुख्यमंत्र्यांनी मोफत बियाण्यांचा गुजरात पॅटर्न का स्वीकारत नाहीत, असा प्रश्न भारिप बहुजन संघाचे अध्यक्ष प्रकाश आंबेडकर यांनी विचारला आहे
अकोला जिल्हा परिषदेमार्फत अकोल्यातील साडेतीन हजार अल्पभूधारक शेतकऱ्यांना बीटी कापसाच्या बियाण्यांचं मोफत वाटप करण्यात येत आहे. यावेळी ते बोलत होते.
गुजरातमध्येही शेतकऱ्यांना मोफत कापसाचं बियाणं मिळतं. मग मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील सर्व शेतकऱ्यांना मोफत बियाणं उपलब्ध करुन द्यावं अशी मागणी आंबेडकरांनी केलीय.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
क्राईम
महाराष्ट्र
महाराष्ट्र
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
![ABP Premium](https://cdn.abplive.com/imagebank/metaverse-mid.png)