एक्स्प्लोर

Maharashtra Government Portfolios: मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मात्र सर्व महत्वाची खाती फडणवीसांकडेच! भाजपच ठरला मोठा भाऊ?

Maharashtra Government Portfolios: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातील खातेवाटेप आजअखेर झालं.

Maharashtra Portfolios: राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारातील खातेवाटेप आजअखेर झालं. त्यानुसार शपथ घेतलेल्या 18 मंत्र्यांमध्ये खाती वाटण्यात आली आहेत. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde)  यांच्याकडं 14 तर, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांच्याकडं आठ महत्वाच्या खात्यांची जबाबदारी सोपवण्यात आलीय. 

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडं सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम, परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेल्या विभागाची जबाबदारी सोपवली गेली. तर, राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडं गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील.

शिंदे-फडणवीस सरकारच्या मंत्रीमंडळ विस्तारात भाजप नेते चंद्रकांत पाटील यांच्याकडं उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य खात्याची जबाबदारी सोपण्यात आली. याआधीच्या भाजप सरकारमध्ये चंद्रकांत पाटील यांच्याकडं महसूल खात्याची जबाबदारी होती, जी आता राधाकृष्ण विखे पाटील यांच्या खांद्यावर सोपवली गेलीय. तर, सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय खातं देण्यात आलंय. भाजप-शिवसेना युतीच्या सरकारमध्ये सुधीर मुनगंटीवार यांच्याकडं अर्थ खात्याची जबाबदारी होती, जे खातं देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: जवळ ठेवलंय. तर, गिरीष महाजन यांच्याकडं महत्वाचं ग्रामविकास आणि पंचायती राज खातं देण्यात आलंय.

इतर 18 मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे-

राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास

सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय

चंद्रकांत पाटील- उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य

डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास

गिरीष महाजन- ग्रामविकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 

गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 

दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 

संजय राठोड- अन्न व औषध प्रशासन

सुरेश खाडे- कामगार

संदीपान भुमरे- रोजगार हमी योजना व फलोत्पादन

उदय सामंत- उद्योग

प्रा.तानाजी सावंत- सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण

रवींद्र  चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण

अब्दुल सत्तार- कृषी

दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा

अतुल सावे- सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण

शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क

मंगलप्रभात लोढा- पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास

दरम्यान, शिंदे मंत्रिमंडळात 9 ऑगस्ट रोजी भाजपच्या कोट्यातील 9 आणि शिंदे गटातील 9 अशा एकूण 18 मंत्र्यांनी शपथ घेतली. महाराष्ट्र मंत्रिपरिषदेची सदस्य संख्या 20 आहे. शिंदे मंत्रिमंडळ विस्तारात एकाही महिला नेत्याला मंत्री करण्यात आलेले नाही. ज्याप्रकारे शिंदे सरकारचं खातेवाटप झालेलं आहे. त्यावरून या युती सरकारमध्ये भाजपचं मोठा भाऊ ठरल्याचं दिसत आहे. 

हे देखील वाचा-

अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Advertisement
ABP Premium

व्हिडीओ

Rahul gandhi at Hathras : राहुल गांधी हाथरसमध्ये पीडितांच्या कुटुंबीयांच्या भेटीलाPandharpur : विठ्ठल रुक्मिणी मंदिरातील गाभाऱ्यात बसवली चांदीची मेघडंबरीNagpur : बोगस शेतकऱ्यांनी पैसे लाटल्याचं उघड; Ambadas Danve संतापले, म्हणाले...TOP 80 : सकाळच्या 8 च्या 80 बातम्यांचा वेगवान आढावा : टॉप 80 न्यूज : 05 JULY 2024 : ABP Majha

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Britain Election Result 2024 : भारतात राज्यसभेत सासूबाई सुधा मूर्तींचं खणखणीत भाषण, तिकडे जावई ऋषी सुनक यांच्या पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये लेबर पार्टीची सत्ता येणार  
ऋषी सुनक यांच्या हुजूर पक्षाचा पराभव, ब्रिटनमध्ये सत्तांतर, लेबर पार्टी 14 वर्षानंतर सत्तेत
Kolhapur Rain Update : कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
कोल्हापूर जिल्ह्यात आजपासून पुढील पाच दिवस मुसळधार; धरण क्षेत्रात धुवाधार बरसात
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
राज्य मंत्रिमंडळाची थोड्याच वेळात महत्त्वाची बैठक, सरकार 19 महत्त्वाचे निर्णय घेण्याच्या तयारीत
Mirzapur Season 3 OTT Release :  'मिर्झापूर 3'  प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
'मिर्झापूर 3' प्राईम व्हिडीओवर मोफत कसे पाहाल? जाणून घ्या स्टेप बाय स्टेप
Mukesh Khanna On Kalki 2898 AD : 'कल्की 2898 एडी'वर  छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले,  हिंदूंनी आता...
'कल्की 2898 एडी'वर छोट्या पडद्यावरील 'भीष्म' संतापले; मुकेश खन्ना म्हणाले, हिंदूंनी आता...
Nashik Dengue : नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
नाशकात डेंग्यूचा कहर, केंद्रीय पथकाच्या पाहणीदरम्यानच आढळल्या डेंग्यूच्या अळ्या, मनपाच्या औषध फवारणीवर प्रश्नचिन्ह
Vasant More: मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
मी प्रकाश आंबेडकरांना मेसेज टाकला, 'साहेब मला माफ करा'; वसंत मोरेंनी वंचित का सोडली?
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
धक्कादायक! शेळ्या चोरीच्या संशयावरून जमावाकडून महिलेसह तिघांना बेदम मारहाण, एकाचा मृत्यू
Embed widget