एक्स्प्लोर

शिंदे सरकारकडून खातेवाटप जाहीर, चंद्रकांत पाटलांकडे तीन खात्यांचा कारभार, पण महसूल, सहकार मिळाले नाही!

Chandrakant Patil : चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन खात्यांचा कारभार देण्यात आला असला, तरी त्यांनी काम पाहिलेलं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे.

Chandrakant Patil : राज्य मंत्रिमंडळातील नवनियुक्त मंत्र्यांचे खातेवाटप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जाहीर केले आहे.  राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांनी मंजुरी दिल्यानंतर हे खातेवाटप जाहीर करण्यात आले आहे. 

त्यानुसार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे सामान्य प्रशासन, नगर विकास, माहिती व तंत्रज्ञान, माहिती व जनसंपर्क, सार्वजनिक बांधकाम(सार्वजनिक प्रकल्प), परिवहन, पणन, सामाजिक न्याय व विशेष सहाय्य, मदत व पुनर्वसन, आपत्ती व्यवस्थापन, मृद व जलसंधारण, पर्यावरण व वातावरणीय बदल, अल्पसंख्याक व औकाफ तसेच इतर कोणत्याही मंत्र्यांना वाटप न केलेले विभाग त्यांच्याकडे आहेत. 

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गृह, वित्त व नियोजन, विधी व न्याय, जलसंपदा व लाभक्षेत्र विकास, गृहनिर्माण, ऊर्जा, राजशिष्टाचार ही खाती असतील. दरम्यान, चंद्रकांत पाटील यांच्याकडे तीन खात्यांचा कारभार देण्यात आला असला, तरी त्यांनी काम पाहिलेलं महसूल खातं राधाकृष्ण विखे पाटील यांना मिळाले आहे. चंद्रकांत पाटलांकडे उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य मंत्रिपदाची जबाबदारी देण्याता आली आहे.  

महाविकास आघाडीसरकारमध्ये हसन मुश्रीफांनी कारभार पाहिलेल्या ग्रामविकास खात्याचा कारभार गिरीश महाजन यांच्याकडे देण्यात आला आहे. सांगलीच्या सुरेश खाडे यांच्याकडे कामगार खाते, तर सातारच्या शंभुराज देसाईंकडे राज्य उत्पादन शुल्क खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे. 

इतर मंत्र्यांची खाती पुढीलप्रमाणे

  • राधाकृष्ण विखे-पाटील - महसूल, पशुसंवर्धन आणि दुग्धविकास
  • सुधीर मुनगंटीवार- वने, सांस्कृतिक कार्य, व मत्स्य व्यवसाय
  • चंद्रकांत पाटील-  उच्च व तंत्रशिक्षण, वस्त्रोद्योग आणि संसदीय कार्य
  • डॉ. विजयकुमार गावित- आदिवासी विकास
  • गिरीष महाजन-  ग्राम विकास आणि पंचायती राज, वैद्यकीय शिक्षण, क्रीडा व युवक कल्याण 
  • गुलाबराव पाटील- पाणीपुरवठा व स्वच्छता 
  • दादा भुसे- बंदरे व खनिकर्म 
  • संजय राठोड-  अन्न व औषध प्रशासन
  • सुरेश खाडे- कामगार
  • संदीपान भुमरे-  रोजगार हमी योजना व फलोत्पादन
  • उदय सामंत- उद्योग
  • प्रा.तानाजी सावंत - सार्वजनिक आरोग्य व  कुटुंब कल्याण
  • रवींद्र चव्हाण - सार्वजनिक बांधकाम (सार्वजनिक उपक्रम वगळून), अन्न व  नागरी पुरवठा व  ग्राहक संरक्षण
  • अब्दुल सत्तार- कृषी
  • दीपक केसरकर- शालेय शिक्षण व  मराठी भाषा
  • अतुल सावे-  सहकार, इतर मागास व बहुजन कल्याण
  • शंभूराज देसाई- राज्य उत्पादन शुल्क
  • मंगलप्रभात लोढा-  पर्यटन, कौशल्य विकास व  उद्योजकता, महिला व बालविकास
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement

महत्त्वाच्या बातम्या

Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Advertisement
for smartphones
and tablets

व्हिडीओ

Sunil Shelke : आमदार सुनील शेळकेंची नाराजी दूर ? मावळ मतदार संघात डोकेदुखीArchana Patil Chakurkar : डाॅ. अर्चना पाटील चाकूरकर भाजपाच्या वाटेवरPraful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीटABP Majha Headlines :  8 PM : 28 March 2024 : Maharashtra News :  एबीपी माझा हेडलाईन्स

फोटो गॅलरी

पर्सनल कॉर्नर

टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Praful Patel gets Clean Chit : 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून प्रफुल्ल पटेल यांना क्लीन चीट
प्रफुल्ल पटेल यांना दिलासा! 2017 च्या भ्रष्टाचार प्रकरणात CBI कडून क्लीन चीट
Amol Kolhe Video : इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
इवलसं पोर पण सिंहासारखं धाडस, अमोल कोल्हे गुढघ्यावर बसून पाहातच राहिले, शाहू नाव ऐकताच पाया पडले; 'शिवनेरी'वर काय घडलं? 
Whatsapp : व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
व्हॉट्सॲपचा मोठा निर्णय, प्रत्येक एसएमएसवर आकारणार 2.3 रुपये; निर्णय 1 जूनपासून लागू होणार
Shivsena First List : मुलाची उमेदवारी राखीव, कल्याण, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर एकनाथ शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
मुलाची उमेदवारी राखीव, ठाणे, नाशिकसह 5 जागेवर शिंदेंचे उमेदवार अद्याप गुलदस्त्यात!
Hemant Godse : खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
खासदार श्रीकांत शिंदेंनी उमेदवारी जाहीर करूनही हेमंत गोडसे गॅसवर; पहिल्या यादीत नाव नाहीच!
Kolhapur Loksabha : कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
कोल्हापूरचा पेच अखेर सुटला; शिंदे गटातील संजय मंडलिक आणि धैर्यशील मानेंना उमेदवारी जाहीर!
Shirdi Lok Sabha : ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
ठरलं! शिर्डी लोकसभेसाठी शिंदे गटातून सदाशिव लोखंडेंना उमेदवारी जाहीर, ठाकरे गटाच्या भाऊसाहेब वाकचौरेंशी होणार लढत
Rajasthan Royals vs Delhi Capitals: दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
दिल्लीचा नाणेफेक जिंकत गोलंदाजीचा निर्णय; तगडा गोलंंदाज परतला, पाहा दोन्ही संघांची Playing XI
Embed widget