एक्स्प्लोर
महिला पोलिसाच्या घरी शिपायाची गोळी झाडून आत्महत्या
गडचिरोली : गडचिरोलीत पोलिस शिपायाने सहकारी महिला पोलिसाच्या घरी जाऊन आत्महत्या केल्याने एकच खळबळ उडाली आहे. प्रेमसंबंधातून पोलिसाने हे टोकाचं पाऊल उचलल्याच्या चर्चा आहेत.
धानोरा येथील पोलीस ठाण्यात कार्यरत पोलीस शिपाई कन्हैया नैताम यांनी आपल्याच पोलिस ठाण्यातील महिला पोलीस शिपायाच्या रुमवर जाऊन आपल्याच बंदुकीने गोळ्या झाडून आत्महत्या केली. ही घटना प्रेम प्रकरणातून घडल्याची जोरदार चर्चा आहे.
कन्हैया पोलिस संकुलात राहत होते तर कन्हैया यांची पत्नी आणि दोन मुलं गडचिरोलीत राहतात. धानोरा पोलिस ठाण्यात कार्यरत महिला पोलिस शशिकला तुलावी यांच्याशी ओळखी झाली होती. शशिकला पतीपासून वेगळी झाल्यानंतर लहान मुलीसोबत भाड्याने घेतलेल्या घरात राहत होती. कन्हैया यांचे शशिकलाच्या रुमवर नेहमी येणं-जाणं असल्याचं म्हटलं जातं.
रविवारी दोघेही शशिकलाच्या रुमवर गेले, सकाळी 9 वाजता कन्हैया यांनी अचानक गोळी झाडून आत्महत्या केली. गोळीचा आवाज ऐकताच नागरिकांनी घटनास्थळी धाव घेतली. कन्हैयांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला आहे.
अधिक पाहा..
Advertisement
Advertisement
Advertisement
महत्त्वाच्या बातम्या
मुंबई
निवडणूक
पुणे
विश्व
Advertisement